Home यवतमाळ उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वार्षिक सर्व साधारण सभा 2024_2025

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वार्षिक सर्व साधारण सभा 2024_2025

59

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वार्षिक सर्व साधारण सभा 2024_2025

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष . पंचायत समिती कळंब अंतर्गत स्थापित उन्नती महिला प्रभाग संघ कार्यालय जोडमोहा अंतर्गत आर्थिक वर्ष २०२४/२०२५ या आर्थिक वर्षाची दहावी सर्वसाधारण सभा समाज भवन ग्रामपंचायत थाळेगाव सभागृह मधे दिनांक ३१/०७/२०२५ गुरुवार ला सौ.सुरेखा धनराज बोपटे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. तसेच प्रभागाचे सर्व सदस्य उपस्थित असुन प्रभागातील 24 ग्रामसंघाचे कार्यकारी सदस्य व कार्यरत समुदाय संसाधन व्यक्ती उपस्थित होते तसेच तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष मधील मा. प्रतिभा बावनकर क्षमता बांधणी व संस्थीय बांधणी , श्री. प्रशांत दुरबुडे सर, विशाल सर, उमेश सेवकर सर, जवके सर, सागर मून, महेश बोरकर सर , आदी सर्व उपस्थित होते. सर्वसाधारण सभेची सुरवात प्रार्थना ने करण्यात आली.सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे व दीपप्रवजन सर्व प्रभाग संघ संस्था कळंब च्या सर्व सदस्यांनी व तालुका कार्यालय अधिकारी यांनी केले.

गरिबाना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी अभियानाची सुरवात २०११_२०१२ झालेली आहे . दशसूत्रीवर हे अभियान काम करते पण आता आपण दहाव्या सूत्रावर काम करावे तर आपल्याला पहिल्या नियमित बैठक यावर काम करण्याची वेळ येत आहे . जेव्हा पहिले सूत्रावर व्यवस्थित काम होईल आपला पाया मजबुत होईल तेव्हा त्या वर इमारत बांधणीचे काम करू शकतो म्हणून सर्वांनी व्यवस्थित कामकाज करावे आपली भूमिका समजुन घ्यावी.असे मनोगत व पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या मा. प्रशांत दुरबुडे सर यांनी केले .तसेच वार्षिक सभेत महत्व काय असते , अजेंडा कसा असावा, या बाबत प्रभाग संघ कुणाचा आहे, जेडर संसाधन केंद्र बाबत त्याचे महत्व इत्यादी बाबत असे सविस्तर पने मार्गदर्शन मा.प्रतिभा बावनकर मॅडम यांनी आपले मनोगत व पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे यांनी विविध विषयावर माहिती मार्गदर्शन केले. आर्थिक वर्षात उत्कृष्ट ग्राम संघ म्हणून उडान ग्राम संघ ला गौरव चिन्ह देऊन त्याचा सत्कार करण्यात आलेला आहे. तसेच उत्कृष समुदाय संसाधन व्यक्ती सुनिता रमेश कामडी ,छबू विलास पिंपळखुटे , रजनी पाटील ,सीमा प्रदीप ठाकरे ,रंजना बंडुजी उमरे,उज्वला सुमेध शेळके ज्योसना रंगराव एलकर, मंदा रणजीत मुन , नितेश रमेश डहारे,जयश्री गजानन आत्राम, अर्चना नरेश चचाणे प्रतिभा मारोती शिवरकर,भावना निलेश तोडसाम,ममता विनोदराव लखपती यांना गौरव चिन्ह देऊन त्याचा सत्कार करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक सौ. ममता लखपती यांनी केले,वार्षिक सभेत आर्थिक वर्ष २०२४ _२०२५या आर्थिक वर्षाचे वाचन प्रभागाचे हिसेबविस प्रतिभा शिवरकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ. वैशाली लखपती प्रभागाच्या BDSP यांनी केले तर अध्यक्षीय भाषण व आभार व्यक्त करून कार्यक्रम पार पडला या कार्यक्रम ला प्रभागातील नितेश डहारे, सीमा आत्राम, दीपक लीलारे, प्रीती कांबळे, अखिलेश नागपुरे, कैलास लीलारे, सीमा ठाकरे , व प्रभाग समन्वयक , व प्रभागाच्या सर्व सदस्यांनी मौलिक सहकार्य केले.

Copyright ©