Home Breaking News पोलीसांनी अवैध लकडी भरलेला आयशर पकडला वनविभागाची अब्रू चव्हाटय़ावर!

पोलीसांनी अवैध लकडी भरलेला आयशर पकडला वनविभागाची अब्रू चव्हाटय़ावर!

124

पोलीसांनी अवैध लकडी भरलेला आयशर पकडला
वनविभागाची अब्रू चव्हाटय़ावर!

साखरखेर्डा l प्रतिनिधी – दि. 10 मे रोजी मध्यरात्री पोलिसांनी मटका किंगचा अवैध लिंबाच्या लकडीने भरलेला आयशर पकडला असून वनविभागाच्या खळग्या भरणाऱ्या अवैध वृक्षतोड करणाऱ्यामध्ये पोलीसांविषयी दहशत निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार असे समजते की, दि 10 मे चे मध्यरात्री साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे हे स्टॉफसह मलकापूर पांग्रा बिट हददीत पेट्रोलींग करीत असतांना पंडीत नेहरु विदयालयाचे पुर्व बाजुस भाजपाचा कार्यकर्ता साबीर खान पठाण यांचे घराचे पाठीमागील बाजुस आयशर वाहन क्रमांक एम एच 28 एन 2882 या वाहानामध्ये निम, बाबुळ व ईतर जंगली लाकडे कटाई करुन भरतांना मिळुन आले. घटनास्थळी साबीर खान सुलतान खान पठाण रा. मलकापूर पांग्रा हे येवुन त्यांनी सदर लाकडे त्यांचेच मालकीची असले कबूल करून देउळगांव मही सिददीक सेठ यांचे कडे घेवुन जात आहे असे सांगीतले असता त्यांना सदर लाकडा बाबत वण विभागाचा वाहतुक पास तसेच वृक्ष तोड परवाणा आहे काय ? असे विचारणा केली असता त्यांचे जवळ वण विभागाचा वाहतुक पास तसेच वृक्ष तोड परवाणा मिळुन आला नाही.
दरम्यान पोलीसांनी वनविभागाला कारवाईच्या सुचना दिल्या आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून मलकापूर पांग्रा शिवारात चोरून वृक्षतोड होत असल्याबाबत शेतकऱ्यांनी कारवाई करण्यासाठी मेहकर वनविभागाला वारंवार साकडे घातले होते. मात्र वृक्षतोडांशी वनविभागाच्या सबंधितांचे साटेलोटे असल्याने साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वृक्षतोड करून अवैध कटई करून दिवसाढवळ्या लकडीची वाहतूक करण्यात येत असताना वनविभाग मात्र जाणून बुजून डोळेझाक करीत असल्याने शेतकरी वर्ग संतप्त झाल्याचे पाहून पोलीसांनीच कठोर पाऊली उचलली आहेत. उपरोक्त लकडीचा मालक भाजपाचा कार्यकर्ता असला तरी सर्वच पक्षांच्या नेत्यांशी निगडित असल्याने सर्व पक्षांच्या पुढाऱ्यांनी पोलीसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करून सदर मटका किंगला पाठिशी घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला असलेल्याची चर्चा आहे. आता सदर आशयर मध्ये तपासणी अंती नेमके काय आढळते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. मात्र पोलिसांनी केलेल्या या कारवाईने वनविभागाच्या निष्क्रियतेचा टराटर बुरखा फाडून वनविभागाची अब्रू चव्हाटय़ावर आणली आहे. पोलिसांच्या या कारवाईने परिसरातील शेतकरी वर्गात आनंद व्यक्त होत आहे.
◾◾◾
पोलिसांनी उपरोक्त लकडीचा आयशर पकडताच घटनास्थळी साबीर खान सुलतान खान पठाण यांनी लोकप्रतिनिधींना घटनास्थळी फोन करून वाहन ताब्यात देण्यासाठी पोलीसांवर दबाव आणला मात्र पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे हे जुमानत नसल्याचे पाहून साबेरखा पठाण यांनी वाहनात बिघाड करण्याचा प्रयत्न करून मजूर, चालक पसार केले. दरम्यान पोलीस चालक सुजीतसिंग मेहेर यांनी स्वतः आयशर चालवत पोलीस ठाण्यात जमा केले. त्यामुळे आयशर मध्ये काहीतरी गौडबंगाल दडले आहे का? हे तपासणी अंती सिध्द होईल.

Copyright ©