Home Breaking News जन्मदिनीच मिळाले नोकरीचे “गिप्ट” साखरखेर्डा येथील कु संहिता राजपूत ची एच डी...

जन्मदिनीच मिळाले नोकरीचे “गिप्ट” साखरखेर्डा येथील कु संहिता राजपूत ची एच डी एफ सी बॅंकेत टिम लिडर म्हणून नियुक्ती

113

जन्मदिनीच मिळाले नोकरीचे “गिप्ट”
साखरखेर्डा येथील कु संहिता राजपूत ची एच डी एफ सी बॅंकेत टिम लिडर म्हणून नियुक्ती
साखरखेर्डा lप्रतिनिधी – येथील महाराणा प्रताप नगरमध्ये राहणाऱ्या अनिलसिंग गोपिकिसनसींग राजपूत यांची कन्या कु. संहिता राजपूत हिची जन्मदिनीच एच डी एफ सी हैदराबाद बॅंकेत कार्पोरेट सेक्टर मध्ये टिम लिडर म्हणून नियुक्ती झाली आहे.
कु संहिताने युनिव्हर्सल ए आय युनिव्हर्सिटी कर्जत, मुंबई येथून फायनान्स या विभागात एम बी ए, मेरीट मध्ये घवघवीत यश संपादन केल्यानंतर कॅम्पसच्या मुलाखतीत  एच डी एफ सी बँक हैद्राबादसाठी कार्पोरेट क्षेत्रात टीम लिडर म्हणून  दि. 18 मे 2026 रोजी रुजू होऊन चेन्नई येथे प्रशिक्षणासाठी रवाना झाली आहे. . विशेष उल्लेखनीय म्हणजे संहिताच्या जन्मदिनीच तिला नोकरीचे बक्षीस मिळाल्याचा योगायोग जुळून आला आहे.
तिचे वडील अनिलसिंग राजपूत हे आदर्श शेतकरी असून बेताची परिस्थिती असताना देखील मुलीच्या शिक्षणासाठी बाहेरगावी आयुष्य घालविले. दरम्यान संहिताला शिक्षण घेत असताना प्रधानमंत्री, विद्यालक्ष्मी योजनेचा लाभ ही मिळाला . तसेच एम बी ए करित असतांनाच युनिव्हर्सिटी कडून दहावी नंतर सतत मेरिट मध्ये पास झाल्यावर स्वतंत्र शिष्यवृत्ती साठी ती पात्र झाली होती या पैशातून तिला यशाचे  सहज शिखर सर करता आले  संहिताला मैदानी खेळाची आवड असल्याने मैदानी खेळात युनिव्हर्सिटी कडून तीन गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र मिळाले .साखर खेर्डा येथील सहकार विद्या मंदिरापासून शिक्षणाची सुरुवात झाली होती. संहिताच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून तिने आपल्या यशाचे श्रेय आई – वडिल व शिक्षकांना दिले आहे.

Copyright ©