Home Breaking News केमिस्ट असोसिएशन कडून उद्या साखरखेर्डा बंद

केमिस्ट असोसिएशन कडून उद्या साखरखेर्डा बंद

165

केमिस्ट असोसिएशन कडून उद्या साखरखेर्डा बंद

साखरखेर्डा : (असलम अंजुम ) ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टच्या वतीने त्यांच्या विविध मागण्यासाठी दि. २० मे रोजी बंद चे आयोजन करण्यात आले आहे.
ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स (AIOCD) च्या वतीने ऑनलाईन औषध विक्रीवर बंदी घालण्याबरोबरच कॉर्पोरेट्सद्वारे ग्राहकांना औषधीवर दिली जाणारी सूट बंद करुन बनावटी औषधीपासून देशाला वाचविण्यासाठी देशभरात एक दिवस बंदचे आयोजन करण्यात आले असून केंद्रीय संघटनेच्या या रास्त मागणीला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाठींबा देत पोलीस स्टेशनला एक निवेदन सादर केले आहे. यावेळी साखरखेर्डा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष नितीन ठोसरे, गोपाल मानतकर, श्याम राऊत, विकी जगताप,
विजय जैवळ, बंडू खरात, तुषार चव्हाण, अविनाश मुदमाळी, शंकर दसरे, आदित्य तिवारी,
राहूल कामे, गजानन मुंढे आदी उपस्थित होते.

Copyright ©