Home Breaking News स्थागुशा व अंढेरा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी : सिनेस्टाईल पाठलाग करत ५ दरोडेखोरांच्या...

स्थागुशा व अंढेरा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी : सिनेस्टाईल पाठलाग करत ५ दरोडेखोरांच्या जालना हद्दीवर आवळल्या मुसक्या

77

स्थागुशा व अंढेरा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी : सिनेस्टाईल पाठलाग करत ५ दरोडेखोरांच्या जालना हद्दीवर आवळल्या मुसक्या

🔸असलम अंजुम 🔸

साखरखेर्डा : (दि.२ मे ) अंढेरा पोलीस व स्थागुशा पोलिसांनी ५ दरोडेखोरांचा सिनेस्टाईल पाठलाग करत त्यांना जालना हद्दीवर जेरबंद करुन त्यांचेकडून ४ लाख ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबतची हकीकत अशी की, फिर्यादी चंद्रशेखर गुंडय्या स्वामी (वय ३२ वर्षे) रा. शंकरनगर, वसरणी नांदेड यांच्या तक्रारीनुसार दि. १ मे च्या दुपारी ४ ते ५ वाजता चिखली ते दे.राजा रोडवरील राजवाडा चिखली येथे आरोपी निलेश नरेश भोसले, जॅकीचंद विरोधभाई पवार रा. साकेगांव ता.चिखली यांनी त्यास रत्न व सुलेमानी हकीक या खड्याचा व्हिडीओ विक्री करायाचा म्हणून पाठविला, फिर्यादीस सदरचा खडा आवडल्याने त्यास चिखली येथील राजवाडा परिसरात बोलविले. फिर्यादी हे वरील आरोपींच्या सांगणेवरुन राजवाडा परिसर चिखली येथे आले असता आरोपी निलेश नरेश भोसले, जॅकीचंद विरोधभाई, आदित्य भोसले, राज पवार, भाऊराजा पवार आणि ईतर एक यांनी संगणमत करुन फिर्यादीस चापटा – बुक्क्यांनी व काठीने मारहाण करुन त्यांचेजवळील सोने, चांदी व अष्टधातूचे दागीने तसेच रोख २० हजार रुपये रक्कम असा एकूण ४ लाख ८९ हजार रु. चा मुद्देमाल जबरीने चोरुन घेऊन पळून गेले. अशा रिपोर्टवरुन अंढेरा पोस्टे येथे अप.क्र. १६३/२०२६ कलम ३१० ( २ ) भान्यासं प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच स्थागुशा पोनि सुनिल अंबुलकर आणि अंढेरा पोस्टे चे सपोनि रुपेश शक्करगे यांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केले. त्या अनुषंगाने, दि.१ मे रोजी तपास पथकांना गुन्ह्यातील आरोपी निलेश नरेश भोसले हा ग्राम साकेगांव येथे तर उर्वरीत आरोपी हे जालना जिल्ह्यामध्ये पळून जात असल्याची
गोपनीय माहिती मिळाली त्या आधारे पोनि सुनिल अंबुलकर व सपोनि रुपेश शक्करगे यांचे नेतृत्वात जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात येऊन आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये स्थागुशा व अंढेरा यांच्या पथकाने ग्राम साकेगांव ता. चिखली येथून आरोपी निलेश नरेश भोसले यास अटक केली. तर उर्वरीत आरोपी जॅकीचंद विरोधभाई पवार, आदित्य शेनु भोसले, राज अभिमान पवार, भाऊराजा शाबनदार पवार हे बुलढाणा जिल्ह्यातून जालना जिल्ह्याकडे पळून जात असतांना त्यांचा पाठलाग करत ३ किमी शेतामध्ये धावत जाऊन पकडले.
वरील आरोपीना केवळ २४ तासांच्या आंत जेरबंद करुन त्यांचेकडून सोन्याच्या दोन अंगठ्या १४ ग्रॅम किंमत २ लाख ८० हजार रु, सोन्याचे कानातील २ कुंडल ५ ग्रॅम किंमत ७० हजार रु, चांदीचे ४०० ग्रॅम कडे किंमत १ लाख रु., चांदीचे ब्रासलेट २ तोळे किंमत ५ हजार रु., चांदीच्या २ बेड्या ४० ग्रॅम किं. १० हजार रु, अष्टधातू गदा १०० ग्रॅम किं.१ हजार रु., चांदीची अंगठी ५ ग्रॅम किं. १ हजार रु, चांदीची राखी किं. १ हजार रु., चांदीची चैन ५ ग्रॅम किं. १ हजार रु, तसेच नगदी रोख ११ हजार रु. असा एकूण ४ लाख ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे आदेशान्वये तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि अमोल गायकवाड, उपविपोअ संतोष खाडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशा पोनि सुनिल अंबुलकर यांचे नेतृत्वात अंढेरा सपोनि रुपेश शक्करगे, PSI प्रताप बाजड, पोहेकॉ दिगंबर कपाटे, शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, मपोहेकॉ वनिता शिंगणे, पोकॉ मनोज खरडे, अमोल अंभोरे, मपोकॉ पूजा जाधव, चासफौ विकास देशमुख, PSI दिनेश घुगे, पोहेकॉ सिध्दार्थ सोनकांबळे, भरत पोफळे, पोकॉ किशोर जाधव, श्रीकांत पव्हरे, पोहेकॉ राजू आडवे तांत्रीक विष्लेषण विभाग, बुलढाणा यांचे पथकाने केली.

Copyright ©