Home Breaking News एसईएस कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १००% : अकसा अकबर शेख विज्ञान शाखेतून पहिली...

एसईएस कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १००% : अकसा अकबर शेख विज्ञान शाखेतून पहिली तर गौरी शशिकांत काटे दुसरी 

514

एसईएस कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १००% :
अकसा अकबर शेख विज्ञान शाखेतून पहिली तर गौरी शशिकांत काटे दुसरी 

🔸असलम अंजुम🔸

साखरखेर्डा : (दि. २ मे ) येथील एसईएस कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १००% लागला असून कु.अकसा अकबर शेख हीने विज्ञान शाखेतून पहिली येण्याचा मान मिळविला आहे.
येथील साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालीत एसईएस कनिष्ठ महाविद्यालयाने याहीवर्षी आपल्या उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. विज्ञान शाखेतून
कु.अकसा अकबर शेख हिने ९१.६७% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला असून गौरी शशिकांत काटे हिने ९०.६७% घेत दुसरा तर
राजु रामसिंग राजपूत याने ८९.८३% प्राप्त करुन तिसरा क्रमांक मिळविला आहे.
या कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेतून समिक्षा राजेंद्र खिल्लारे ७९.६७% गुण प्राप्त करुन प्रथम, रोहन परमेश्वर खिल्लारे ७८.५०% गुण प्राप्त करुन द्वितीय तर कोमल शत्रुघ्न आंभोरे ७७.८३% गुण प्राप्त करुन तृतीय. तसेच वाणिज्य शाखेचे प्रेम विलास आंभोरे ८५.५०% गुण प्राप्त करुन प्रथम, अथर्व योगेश कुळसुंदर ८२% गुण प्राप्त करुन द्वितीय तर मोहिनी मुकुंदा गुरव ८१. ५०% गुण प्राप्त करुन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. या कॉलेजच्या एमसीव्हीसी विभागातील ज्ञानेश्वर आनंदा जाधव, पल्लवी संतोष लहाने, सागर सीताराम कव्हळे या विद्यार्थ्यांनीही प्राविण्य गुण प्राप्त करुन विद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे. संस्थेचे सचिव चंद्रशेखर शुक्ल, प्राचार्य व्ही.एम.ठाकूर, कमवि चे प्राध्यापकवर्ग तसेच कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे विद्यालयाची यशाची परंपरा कायम असल्याने पालकवर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Copyright ©