पिंपळगाव उंडा येथे हार्वेस्टर अॉफरेटचा मृत्यू नसून खूनच ठाणेदार करेवाड यांनी लावला सात तासात छडा
साखरखेर्डा lप्रतिनिधी – येथील पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मौजे पिंपळगांव उंडा येथे पंजाबच्या हार्वेस्टर अॉफरेटचा मृत्यू नसून खूनच झाल्याचे रहस्य दि 30 एप्रिल रोजी रात्री उलगडले दरम्यान ठाणेदार गजानन करेवाड यांनी सहा तासात छडा लावत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे.
दि 30 एप्रिल चे सकाळी हरिदर सिंग इद्रजीत सिंग वय 43 वर्ष व्यवसाय – हार्वेस्टर मशीन अॉफरेटर रा. राजेंद्र नगर पो.स्टे मुलेपुर ता. फतेगड साहीब जिल्हा फतेगड साहीब राज्यं पंजाब. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सकाळी मर्ग दाखल केला होता.
,करमजीत सिंग उर्फ मंजीतसिंग जनकसिंग वय 55 वर्ष रा. सफीपुर ता सुनाम जिल्हा संगरुळ पंजाब हा दि 29 चे रात्री खाटेवर पिंपळगांव उंडा शिवारात झोपला होता दुसरे दिवशी दि 30 एप्रिल रोजी सकाळी साडेपाच चे सुमारास
शिवाजी काळे हे व्यायाम करण्याकरीता आले असता त्यांना करणजीत सिंग उर्फे मजीत सिंग जनकसिंग हा
बाजेच्या खाली उबडा पडलेला दिसला त्यांनी जवळ जावुन पाहीले असता त्याला आवाज
दिला परंतु प्रतीसाद देत नव्हता त्यामुळे त्यानी त्याला हलवुन पाहीले असता तो मृत झाल्याचे दिसून आले. त्या नंतर त्याने गावातील सरपंच उमेश उर्फे बाळु भास्कर काळे यांना कळविले दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी दुय्यम ठाणेदार संदीप मेधने, पो. कॉ. लक्ष्मण इनामे, पो कॉ नीलेश मोरे, यांनी धाव घेतली असता त्याचे डोक्याला मार लागला असल्याचे दिसून आले. त्यावरून पोलिसांचा संशय बळावला दरम्यान सदर माहिती लगेच ठाणेदार गजानन करेवाड यांना देण्यात आली. ठाणेदार गजानन करेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन वरिष्ठांना माहिती दिली दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, फॉरेन्सिक टिमने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान ठाणेदार गजानन करेवाड यांनी सात जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता यातील एक जण फरार असलेल्याचे कळाले पोलीसांनी लागलीच यातील फरार हेल्पर बबलीसींग करणसींग वय 34 मु पो अकलीया के कंडाल ता मानसा जि मानसा (पंजाब) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आई बहिणीवर शिविगाळ केल्यामुळे लोखंडी सळईने त्याला जीव मारल्याची कबूली दिली आहे. दरम्यान पोलीसांनी त्याचेवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
📍📍📍 अशी झाली गुन्ह्याची उकल ठाणेदार करेवाड यांनी सात जणांना ताब्यात घेतले दरम्यान त्यातील अमितकुमार नामक इसम हा मृतकांसोबत झोपायचा. ईतर सहा जण आपापल्या हार्वेस्टर जवळ दूरवर मुक्कामी राहायचे. पोलीसांनी सात सात जणांची कसून चौकशी केली तरी देखील संशयायाची सुई सापडेना दरम्यान करेवाड यांनी अमितकुमार ला पोलीसी हिसका दाखवला आणि त्याने आरोपि आणि मृतकात वाद झाल्याची कबुली दिली. दरम्यान ठाणेदार करेवाड यांनी आरोपी बबलीसींग याला ताब्यात घेऊन पोलीसी हिसका दाखवला असता त्याने खून केल्याची कबुली देत आपण गजरखेड फाट्यावर एका टिनशेड समोर झोपल्याचे सांगितले. ◾◾ वार केल्यावर मृतकाचा मालकाला फोन! मृतकाला बबलीसींग याने 29 चे रात्री लोखंडी टामिने मारहाण केली दरम्यान त्याचे डोक्याला मागून वार करून त्याला खाटेवर झोपवले व त्याचे संशय येऊ नये म्हणून त्याचे कानावर मोबाईल ठेवून आरोपी पसार झाला. दरम्यान मृतकाने आरडा ओरडा केला मात्र आसपास कुणीच नसल्याने त्याने रात्री बारा वाजता मालकास दोन फोन केले मात्र उचलले नसल्याने उशीराने तडपून तो गतप्राण झाला. डोक्याला पगडी बांधल्याने रक्तस्त्राव दिसला नाही. तेथून पसार झाल्यावर आरोपीनेही भावाला रात्री फोन केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीसांना मुख्य आरोपीपर्यंत पोहचने शक्य झाले. पंजाब ला राहणाऱ्या कुटूंबियांला खूनाची माहिती दिली असून दोन दिवसापासून मृतदेह मेहकर येथे शवविच्छेदनाच्या प्रतिक्षेत आहे. कुटुंब आल्यावर शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांना देण्यात येणार आहे. आरोपीला पोलीस कोठडी मिळाली आहे. -ठाणेदार गजानन करेवाड पोलीस स्टेशन, साखरखेर्डा