Home Breaking News ग्रापं सदस्य शेख अनीस हजयात्रेला रवाना : शेंदुरजन मध्ये हिंदू – मुस्लिम...

ग्रापं सदस्य शेख अनीस हजयात्रेला रवाना : शेंदुरजन मध्ये हिंदू – मुस्लिम एकतेचे दर्शन

90

ग्रापं सदस्य शेख अनीस हजयात्रेला रवाना : शेंदुरजन मध्ये हिंदू – मुस्लिम एकतेचे दर्शन 

🔸असलम अंजुम 🔸

साखरखेर्डा : (दि. ३० एप्रिल ) इस्लाम धर्मात हजयात्रा करण्याला अत्यन्त महत्वाचे स्थान आहे. कलमा, नमाज, रोजा, हज आणि जकात हे इस्लामचे पाच मुलमंत्र. अगदी गरीबातला गरीब माणूसही हजयात्रा करण्यासाठी मक्का – मदीना या पवित्र शहरांना भेटी देण्यास उत्सुक असतो व त्यासाठी आयुष्यभर कष्टाच्या कमाईतून पैशे साठवत असतो.
दरवर्षी लाखो भाविक या पवित्र हजयात्रेसाठी मक्का – मदीनाला जात असतात. यावर्षी शेंदुरजन सारख्या छोट्याशा गावातून ग्रामपंचायत सदस्य शेख अनीस शेख याकूब हे काल हजयात्रेसाठी रवाना झाले. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे व इतर हिंदू बांधवांनी उपस्थित राहून शेख अनीस यांचे शाल आणि पुष्पमालांनी सत्कार करुन त्यांना भावपूर्ण निरोप दिला. एव्हढेच नव्हे तर आपल्या देश आणि लोकांच्या कल्याणासाठी अल्लाहपुढे नतमस्तक होऊन दुआ (प्रार्थना) मागण्याची विनंतीही केली. यावेळी शँकर उगलमुगले, गैबी मुंढे, अनंता देशमुख यांचेसह गुरु मौलाना, सै.युसूफभाई, शे.जमीर, शे.वसीम दिलावर, शे. अनीस दिलावर, सै.मन्सूर, शे. मजीद आदी उपस्थित होते. यानिमित्ताने मात्र शेंदुरजन येथे हिंदू – मुस्लिम एकतेचे दर्शन घडले.

Copyright ©