Home Breaking News शिक्षकातला राक्षस जागा झाला लघूशंकेला उशीर झाला म्हणून सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोके फोडले

शिक्षकातला राक्षस जागा झाला लघूशंकेला उशीर झाला म्हणून सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोके फोडले

531

शिक्षकातला राक्षस जागा झाला
लघूशंकेला उशीर झाला म्हणून सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोके फोडले
जिजामाता विद्यालयातील प्रकार
साखरखेर्डा lप्रतिनिधी – येथील जिजामाता विद्यालयात इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या जिंतूर तालुक्यातील एका विद्यार्थ्याने लघवीला वरून परत येण्यास विलंब केला म्हणून त्याचे डोके डेस्कवर आपटून जखमी केल्याची घटना दि २१ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली.
प्राप्त माहितीनुसार असे समजते की, येथील श्रीमज्जगदगुरु पलसिध्द महास्वामी मठात शिवपाठ शिकण्यासाठी राज्यातील अनेक विद्यार्थी येथे शिकत आहे. शिवपाठाबरोबर त्यांचे प्राथमिक शिक्षण देखील साखरखेर्डा येथे झाले पाहिजे म्हणून बहुतांश विद्यार्थी हे शिवाचार्य रत्न सिध्दलिंग शिवाचार्य जिजामाता विद्यालयाचे संचालक असल्याने जिजामाता विद्यालयात शिक्षण घेतात जिजामाता विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा चांगला आहे म्हणून हे विद्यालय प्रसिद्ध आहे असे असताना शिवपाठाचे शिक्षण घेणाऱ्या जिजामाता विद्यालयात इयत्ता सातवीत शिक्षण घेत असलेल्या अनिकेत सिध्देश्वर स्वामी रा मानकेश्वर ता जिंतूर हा विद्यार्थी एका शिक्षकाची परवानगी घेऊन लघवीला गेला परत आल्यावर वर्ग शिक्षक राजेंद्र पडघान यांनी त्यास कुठे गेला होता असे विचारले क्षणार्धात डोके डेस्कवर आपटून जखमी केले. दरम्यान त्याचे डोके फुटून रक्तस्त्राव सुरु झाल्यावर वर्गातील स्वराज स्वामी, वेदांत भालेकर यांनी लागलीच शाळेच्या जवळ असलेल्या डॉ योगेश झाल्टे यांचेकडे उपचारासाठी दाखल केले. दरम्यान दवाखान्यातून सदर विद्यार्थी भयभीत होऊन मठात आल्यावर शिवाचार्य रत्न सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांना हकिगत सांगितल्यावर महाराजांनी शिक्षकाची कानउघडणी केली आहे. दरम्यान सदर राक्षसी वृत्तीच्या शिक्षकांबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आईवडिलांना सोडून हे विद्यार्थ्या आपल्या गुरू माउलींच्या छत्राखाली मठात राहतात. अतीशय बेताची परिस्थिती असल्याने अशा विद्यार्थ्यांसाठी मठात मोफत शिक्षण देऊन निवासाची व्यवस्था केली जाते असे असताना अशा विद्यार्थ्यांस शिक्षकाची राक्षसी वागणूक मिळत असल्याने जिजामाता विद्यालयाच्या शिस्त अन माणूसकीचे धडे गिरवणाऱ्या या विद्यालयाला या शिक्षकाने काळीमा फासली आहे. वृत्त लिहिलेपर्यंत पोलिसांत तक्रार दाखल नाही.
◾◾◾
सकाळी जिजामाता विद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी जखमी अवस्थेत अनिकेत स्वामी ह्या विद्यार्थ्यांला माझेकडे उपचारासाठी आणले होते. तो रक्तस्त्राव झाल्याने घाबरला होता आता त्याची प्रकृती बरी आहे.
डॉ योगेश झाल्टे
साखरखेर्डा

Copyright ©