गंगा सारखे मिळाले मोतीला जीवनदान
गौमाते करिता डॉ.बनले देवदूत
गायीच्या पोटात ९ खिळे, ३ पैश्याचे कॉइन, बांगड्यांची तुकडे, ब्लेड, रिंग, काचेचे तुकडे आणि तब्बल ४० किलो प्लास्टिक
डॉ. कोठारी सर, अर्थोपेडिक सर्जन यांच्या गंगा नावाच्या गायीचे एक वर्ष अगोदर पोटाचे ऑपरेशन करून तब्बल ३५ किलो प्लास्टिक काढण्यात आले होते. तसेच आज दिनांक १९/०७/२०२५ रोजी मोती या नावाच्या गायीचे ऑपरेशन करून तब्बल ४० किलो प्लास्टिक काढण्यात आले.
हर्षल डांबारे यांच्या मालकीची गाय, एक महिन्या अगोदर वर्धा जिल्ह्यातून विकत आणली. गायीने एका गोंडस बाळाला जन्म दिला व नंतर चार पाणी कमी करू लागली. हर्षल यांनी एका पशुधन पर्यवेक्षकाकडून उपचार करून घेतले पण कोणत्याही प्रकारच्या उपचाराला साथ मिळाली नाही. डॉ. गोपाल चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलवण्यात आले. त्यांच्या पाहणी दरम्यान लक्षात आले की गायीच्या पोटात प्लास्टिक असू शकते. मेटल डिटेक्टर ने योग्य diagnosis केले.
दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले असता सकाळी ११ वाजता शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. शस्त्रक्रिये मध्ये ९ खिळे, ३ पैश्याचे कॉइन, बांगड्यांची तुकडे, ब्लेड, रिंग, काचेचे तुकडे आणि तब्बल ४० किलो प्लास्टिक काढण्यात यश आले. गाय सध्या सुखरूप आहे.
डॉ. गोपाल उल्हास चव्हाण यांच्या सांगण्यावरून सदरील जनावरांमध्ये फॉस्फरस ची कमतरता असल्याने प्लास्टिक किंवा इतर वस्तू खाण्याची सवय लागते. त्यामुळे ही टाळण्यासाठी आपल्या जनावरांना पशुवैद्याच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले.
