उमेद अभियानाच्या ‘लाडक्या बहिणीं’नी गावातील प्रतिष्ठित नागरिक यांना बांधली राखी
गावातील प्रथम नागरिक सरपंच सौ. सुनंदा मुरकुटे,श्री .महेश इंगोले ग्रामसेवक प्रतिष्ठित नागरिक, आनंद जैस्वाल , पवन धोत्रे पत्रकार, प्रशांत भोयर समाज कार्यकर्ते मा.सौ.कल्पना बंधाटे, पवन जाधव , बापूरावजी चव्हाण ,विनायक म्हैसकर ,ग्राम पंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक जोडमोहा येथील आठवडी बजार‘उमेद’ विशेष विक्री प्रदर्शनाला भेट
‘लाडक्या बहिणीं’नी राखी बांधून व्यक्त केला कृतज्ञता भाव
यवतमाळ दि. ८ ऑगस्ट ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपूर्ण आणि उद्योजक बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उन्नती महिला प्रभाग संघ जोडमोहा अंतर्गत आठवडी बाजारात आयोजित करण्यात आलेल्या राखी व रान भाजी विशेष विक्री प्रदर्शनाला गावातील प्रथम नागरिक सौ. सुनंदा ताई मुरकुटे व ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांनी,ग्राम सेवक , पोलिस पाटील,यांनी भेट दिली.या प्रदर्शनात महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे निरीक्षण करत, सरपंच यानी महिलांशी संवाद साधून त्यांना प्रेरणा दिली. यावेळी महिलांनी राखी बांधून त्यांचा सत्कार करत रक्षाबंधन साजरे केले, ही एक भावनिक आणि प्रेरणादायी भेट ठरली.
राष्ट्रीय हातमाग दिन आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधून ग्रामीण महिलांना बाजार पेठ व व्यासपीठ हातमाग दिन आणि रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रदर्शनात देवानाला, बेलोरी,जोडमोहा, वटबोरी, गांधीनगर, पारडी न खटेश्वर, शरद, इत्यादी गावातील कळंब तालुक्यातील उन्नती महिला प्रभाग संघ जोडमोहा अंतर्गत एकूण 30 महिला बचत गटांनी सहभाग घेतला. या गटांनी तयार केलेल्या वस्तूंमध्ये आकर्षक राख्या, पौष्टिक लाडू, पारंपरिक तोरण, हस्तनिर्मित दागिने, जाम, जेली आणि ज्यूस यांचा समावेश आहे. तसेच, ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत भारतीय राष्ट्रध्वज “तिरंगा” देखील विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.
मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन आणि आश्वासन
प्रत्येक स्टॉलला ग्रामसेवक इंगोले यांनी भेट देत उत्पादनांची माहिती घेतली आणि महिलांना विक्री व ब्रँडिंगसंबंधी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “या उपक्रमांद्वारे ग्रामीण महिलांना आर्थिक संधी उपलब्ध होत असून, शासनाची साथ भविष्यातही अशीच राहणार आहे.”या भेटीदरम्यान ‘उमेद’च्या लाडक्या बहिणींनी मान्यवरांना राखी बांधून आपले प्रेम, स्नेह व कृतज्ञता व्यक्त केली. रक्षाबंधनाचा आनंद या खास प्रसंगामुळे द्विगुणीत झाला.या वेळी उमेद तालुका अभियानाचे प्रभाग समन्वयक श्री. जनार्दन कावरे, कैलास लीलारे CRP EP, दीपक लिलारे CLM, व सदर गावातील कृषी सखी, पशुसखी, ICRP, उद्योग सखी, MCRP,DRT, तसेच इतर मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम करीता जोडमोहा येथील सर्व CRP यांनी मौलिक सहकार्य केले.
