राजकारण्यांच्या हेकेखोर प्रवृत्तीने प्रभागातील समस्यांनी डोके वर काढले!
पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती
महागाव नगरपंचायत कार्यक्षेत्रातील प्रभाग 11 मधील नागरिकांना राजकारण्यांच्या हेकेखोर प्रवृत्तीने प्रचंड समस्या निर्माण झाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात पाणी प्रश्न उद्भवत आहे. रहदारी रस्त्यावरील रपटा बांधकाम पुर्णतःहा दबल्याने सांडपाण्याच्या नालीतील दुर्गंधीयुक्त पाणी हमरस्त्यावर साचत आहे. परिणामी डेंगू मलेरियाच्या मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रभाग वॉर्डमेंबर
भारतीय जनता पक्षाचा असल्याने सत्ताधारी नगरपंचायत प्रशासना द्वारे राजकारणाच्या हेकेखोरी मुळे जनतेला होणाऱ्या त्रासाला, वेदनेला सामोरे जावे लागत आहे. नगरपंचायत प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास प्रभागातील नागरिक आंदोलन करण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत.
भर उन्हाळ्यात या प्रभागात पाणी प्रश्न पेटला होता, तो आजपर्यंत पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी प्रश्न गंभीर होत आहे. नागरिकांनी
बोरवेलसाठी अनेक आंदोलने, निवेदने देऊन सुद्धा बोरवेल झाला नाही.
प्रभाग 11 मधील रपटा मध्येच दबल्यामुळे नालीतील दुर्गंधीयुक्त सांडपाणी बाहेरून वाहत रोडवर साचत आहे.या संदर्भात रहिवासी नागरिकांनी नगरपंचायतला अनेक वेळा या बाबत सूचना केल्यात, परंतु या कडे नगरपंचायत प्रशासनान जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्यावरून शाळेत जाणारे लहान मुले ये जा करतात. मागील आठ ते दहा दिवसापासून साचलेले नालीचे दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचे डबके सिमेंट रोडवर साचल्यामुळे ते येजा करणाऱ्या लोकांवर, विद्यार्थ्यांच्या अंगावर घानपाणी उडून येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी वाढत असून नागरिकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. प्रभागातील नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. सांडपाण्याचा रस्त्यावर शेवाळ झाल्याने वृद्ध नागरिक घसरून पडत आहेत. या प्रभागातील नगरसेविका ह्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत. आणि नगरपंचायत मध्ये महाविकास आघाडीची सत्ता असल्याने या वार्डाच्या समस्येविषयी प्रशासन उदासीन धोरण अवलंबित असल्यामुळे रहिवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे. नगरपंचायत सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हेव्यादाव्याचे राजकारण बाजूला सारून जनतेच्या आरोग्याचा, पाणी समस्येचा तात्काळ निपटारा करावा. या प्रभागात दलित वस्ती आहे. दलित संघटनेचे नेते प्रा. शरदचंद्र डोंगरे पाणी प्रश्नासाठी नगरपंचायत वर धडक दिली होती. प्रभागात पिण्याच्या पाण्यासाठी बोर नाही, येथील लोकांना इतरत्र रहिवाशांच्या धरून तात्पुरते पाणी घ्यावे लागत आहे. यापूर्वी येथील पाण्यासाठी चार इंची बोरवेल मोटरीसहित उपलब्ध होता. परंतु ती उन्हाळ्यात गाळा मध्ये अडकल्या पासून आजतागायत पाणी प्रश्न कायम आहे. नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या समस्येची निपटारा करीत पाणी समस्या निकाली काढावी. मागील सात महिन्यापासून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे, पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावरील सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथी रोगांने डोके वर काढले आहे. डास निर्मूलनासाठी फवारणी करावी, लाईट व्यवस्था व्हावी, प्रशासनाने प्रभागातील रहिवासी नागरिकांचा अंत पाहू नये, जन भावनेचा उद्रेक होऊन जनता रस्त्यावर येण्याच्या मानसिकतेमध्ये आहे, त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची रास्त मागणी आहे.
