Home यवतमाळ पूर्णनग्न आणि उग्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा – ब्ल्यु भीम टायगर अस्थायी कामगार...

पूर्णनग्न आणि उग्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा – ब्ल्यु भीम टायगर अस्थायी कामगार सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

56

पूर्णनग्न आणि उग्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा – ब्ल्यु भीम टायगर अस्थायी कामगार सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

यवतमाळ नगर परिषद प्रशासनाच्या अडमुठ व मनमानी कारभाराविरोधात ब्ल्यु भीम टायगर अस्थायी कामगार सेना, यवतमाळ या संघटनेच्या वतीने १६ जूनपासून साखळी उपोषण सुरू आहे. मात्र सव्वा महिन्याच्या कालावधीत नगर परिषद प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने अखेर कामगारांनी १४ जुलै २०२५ पासून सकाळी ११:०० वाजता पूर्णनग्न व उग्र स्वरूपाचे आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक ९ जुलै(बुधवार) रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन सादर केले असून मागण्यांबाबत सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

 

मागण्या पुढीलप्रमाणे:

हेतुपूर्वक सेवेतून काढून टाकण्यात आलेल्या सफाई अस्थायी कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे.

कामगारांना किमान वेतनानुसार नियमित पगार दिला जावा.

२०२२ ते २०२५ या कालावधीत देयकात झालेल्या तफावतीची चौकशी करून फरक अदा करण्यात यावा.

सर्व कामगारांचे ईएसआयसी भरून लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवावा.

पीएफ भरावा आणि त्याचा लाभही किमान वेतनानुसार द्यावा.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत.

‘आऊटपुट’ पद्धतीने चालणारे कंत्राट बंद करून संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे.

आरोग्य विभाग प्रमुखाची बदली करावी व कंत्राटाच्या देयकांबाबत चौकशी नेमावी.

संघटनेच्या लेटरपॅडवरुन देण्यात आलेल्या तक्रारींवर निर्णय द्यावा.

 

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे,जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत,तर १४ जुलैपासून पूर्णनग्न आणि तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.आंदोलनकर्त्यांना होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या शारीरिक/प्रशासकीय नुकसानीस नगर परिषद प्रशासन,मुख्याधिकारी आणि संबंधित कंत्राटदार हे जबाबदार राहतील,असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

भोंग्यांसाठी परवानगीची मागणी

आंदोलन उग्र स्वरूपाचे असून त्यादरम्यान लाउड स्पीकर (भोंगे) वापरण्याची परवानगी देण्यात यावी,अशी मागणीही करण्यात आली आहे.यावेळी उपस्थितांमध्ये श्याम बनसोड,संजय मेश्राम ,श्रावण चौधरी ,शेख अबास ,शैलेश देशपांडे आकाश ओंकार,नीळकंठ मेश्राम,नितीन भुसरेड्डी,आदेश मेश्राम, विकेश काळे,प्रफुल मेश्राम,अंबादास डोंगरे व इतर सभासद उपस्थित होते.

Copyright ©