Home यवतमाळ गुप्तधनाच्या अंधश्रद्धेवर आधारित नरबळी प्रकरणावर कलार-कलाल समाज संघटनेचा तीव्र निषेध

गुप्तधनाच्या अंधश्रद्धेवर आधारित नरबळी प्रकरणावर कलार-कलाल समाज संघटनेचा तीव्र निषेध

80

गुप्तधनाच्या अंधश्रद्धेवर आधारित नरबळी प्रकरणावर कलार-कलाल समाज संघटनेचा तीव्र निषेध

जयस्वाल कुटुंबातील मायलेकीला पोलिसांनी दिले प्राणदान

वंजारी फैल येथे गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र कलार-कलाल समाज संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आरोपींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.

पोलिसांच्या तत्परतेमुळे जयस्वाल कुटुंबातील आई आणि मुलीचा जीव वाचला. अंधश्रद्धेच्या नावाखाली या मायलेकीचा सात-आठ महिन्यांपासून छळ केला जात होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कलार-कलाल समाज संघटनेने मा. जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन देऊन, आरोपींवर गुन्हे दाखल करून फास्टट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे.

या निवेदनप्रसंगी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर गणेश नाईक, नितीन मेश्राम, गणेश कोसरकर, नितीन उके, सचिन सूरसाऊत, अजित कोसरकर, शामराव कावरे, कुणतीलाल उके, अशोक कावरे, राजू शेंडे, सुरेश पहले, दिनेश सागरे, राजू मानकर, मनीष मानकर, बाळू मेश्राम, योगेश मेश्राम, संजीव शेंडे, सागर पटले, अभिषेक शेंडे व रोहित कोसरकर आदींनी हा आवाज बुलंद केला.

संघटनेने इशारा दिला आहे की, जर कारवाई न झाल्यास समाजामार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Copyright ©