Home यवतमाळ शोतोकाॅन कराटे डो ची बेल्ट परीक्षा संपन्न 

शोतोकाॅन कराटे डो ची बेल्ट परीक्षा संपन्न 

71

शोतोकाॅन कराटे डो ची बेल्ट परीक्षा संपन्न 

शोतोकाॅन कराटे डो असोसिएशन यवतमाळ संलग्न शोतोकाॅन कराटे डो ऑर्गनायझेशन इंडिया द्वारे 28 जून ते 06 जुलै 2025 ला शंकरलाल कोठारी स्कूल व प्रयासवन यवतमाळ येथे बेल्ट परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा शोतोकाॅन कराटे डो ऑर्गनायझेशन इंडियाचे संस्थापक सिहान अतुल बोरा यांच्या मार्गदर्शनाखाली सेंसाई रोहित केवारकर, सेम्पाई हेमंत उईके व सेम्पाई हितेश महानुर, सेम्पाई यश दरवेकर व सेम्पाई गौरव महानुर यांनी परीक्षा घेतली. या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना आपले उत्कृष्ठ परिश्रम व मेहनत करून ही बेल्ट परीक्षा उत्तीर्ण केली. या परीक्षेमध्ये

कु. अधीरा सचिन बागडे, कु. सईशा श्रद्धा संगेप, सक्षम नानपट्टेवार, कु. पाखी नानपट्टेवार, दर्शन गोपाल मिसाळ, स्वरीत गणेश मुकेवार, शिवांश निशांत चव्हाण, पार्थ प्रविण चरहोते, यशश्री राजेश वाघाडे, हे विद्यार्थी येलो बेल्ट साठी पात्र ठरले, तर रोहित भिवगडे, कु. आरोही प्रबुद्धा देठे हे ऑरेंज बेल्ट साठीसाठी पात्र ठरले, तसेच कु.नव्या प्रशांत पेठे हे ग्रीन बेल्ट साठी पात्र ठरले तसेच कु. पूर्वी सुभाष काकडे ब्लू बेल्ट साठी पात्र ठरले तसेच हितांश संदीप रेकवार, कु.सृष्टी सचिन रेकवार, युवान प्रशांत जयस्वाल व प्रथमेश सुभाष काकडे पर्पल बेल्ट साठी पात्र ठरले. तसेच सौ. नेहा रोहित केवारकर व सोहम प्रशांत जयस्वाल हे ब्राऊन बेल्ट साठी पात्र ठरले. तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांमधून शिवांश निशांत चव्हाण ला जूनियर बेस्ट स्टुडंट्स अवार्ड व प्रथमेश सुभाष काकडे ला सीनियर बेस्ट स्टुडंट्स अवार्ड देण्यात आला तसेच

सेम्पाई यश दरवेकर सरांची टीम ला बेस्ट टीम अवार्ड देण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सेंसाई रोहित केवारकर (सचिव – शोतोकाॅन कराटे डो असोसिएशन यवतमाळ), सेंसाई विनोद खोडकुंभे(सचिव – कराटे डो असोसिएशन यवतमाळ) व हेमंत गणेश उईके (कोषाध्यक्ष – कराटे डो असोसिएशन यवतमाळ) यांचे हस्ते या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 06 जुलै 2025 ला प्रयासवन यवतमाळ येथे प्रमाणपत्र व बेल्ट देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थियानी आपले यशाचे श्रेय प्रशिक्षक रोहित केवारकर, अजित मिश्रा, अश्विनी मरसकोल्हे व आई वडिलांना दिले तसेच या विद्यार्थ्यांचे कौतुक सौ. अर्चना कोठारी ( प्राचार्य शंकरलाल कोठारी विद्यामंदिर यवतमाळ), ओंकार चेके (अध्यक्ष स्व.पी. एल. शिरसाट ग्रामीणपत्रकार संघ), प्रवीण दिघाड़े(डायरेक्ट स्केटिंग व कराटे असोसिएशन यवतमाळ), रविन्द्र महानुर व मनोज गुजरे यांनी केले.

Copyright ©