नंददीप फाऊंडेशनला प्रेमभाऊ राठोड यांचे कडून धनादेश
माजी सभापती तथा समाज सेवक प्रा.प्रेमभाऊ राठोड यांनी संदीपभाऊ शिंदे यांना अकरा हजार रुपये देऊन शिंदे यांचे आभार मानले फुल नाही तर फुलाची पाकळी समजू या सेवेत आमचाही थोडा का होईना सहभाग असावा या उद्देशाने हि सेवा घडावी असे प्रा. प्रेमभाऊ राठोड यांनी मत व्यक्त केले तर
यवतमाळ येथील नंददीप फाऊंडेशननी उचललेला वसा हे अकल्पित असून त्यांची जी मानव सेवा आहे हि ना कुणी करू शकले नाही कुणी आजपर्यंत केली त्यांची हीच सर्वात मोठी ईश्वर सेवा आहे त्यांच्या या कार्यास माऊली परिवार सदैव सोबत असल्याचे ही म्हटले मनोरुग्ण सेवा ही साधी नसून हे कार्य फक्त नंद दीप स्वंस्था व त्यांचा परिवारच करुशक्तो असे मत प्रेमभाऊ यांनी व्यक्त केले.या वेळी नंददीपचे अध्यक्ष संदीपभाऊ शिंदे स्व. पी एल. शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके व अनेक मान्यवर उपस्थितीत होते.
