वाळू माफिया कष्टकरी जिल्हा प्रशासन झाले भ्रष्टाचारी
सावळी सदोबा परिसरात दिवस रात्र मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असून तहसील दार,खानिकर्म विभाग,पोलीस,पटवारी,यांची सतत उपस्थिती पाहण्यास मिळत आहे.परंतु वाळू तस्करी मात्र जोमात सुरू आहे.इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांची उपस्थिती असताना वाळू चोरी कशा प्रकारे शक्य होत आहे.असा प्रश्न निर्माण झाला आहे.विशेष सूत्रांनि दिलेल्या माहिती नुसार प्रत्येक अधिकाऱ्यांचे मासिक ठरलेले असून ज्यांचे मासिक ठरले नाही त्यांच्यावर कार्यवाही करण्यात साठी म्हणून सावळी सदोबा परिसरात अधिकारी आपली हजेरी रोजाना लावत आहे.शेकडो ट्रॅक्टर, टीप्पर,सतत चालत असून फक्त एक दोन वाहनांवर कार्यवाही करण्यात येते अधिकाऱ्यांचा अनागोंदी कारभारा मुळे सिद्ध होत आहे.या मध्ये अधिकाऱ्यांचे वाहन खर्च आणि त्यांचा खर्च हा शासनाच्या म्हणजेच जनतेच्या खिशांतून जात असल्याचे दिसून येत आहे.पुढील काळात वाळू घाटांचा लिलाव होणार असून घाट घेणाऱ्या धारकाल घाटातून काय काढावे असा प्रश्न पडला आहे.या मध्ये सामन्यांना सुधा मोठा भुर्दंड बसत आहे.सामन्यांना वाळू साठी आपल्या बजेटा पेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहे.कारण वाळू तस्कराणा अधिकाऱ्यांना मोठी रक्कम मोजावी लागते या मध्ये अधिकाऱ्यांची कमाई येवढी आहे.की अधिकाऱ्यांची आप्त आणि बेनामी संपत्ती अमाप वाढत आहे.अधिकाऱ्यांना हिं मनापल्ली करण्याची हिम्मत कुठूर येते हे पाहिले असता यांच्या वरिष्ठांचे पाठबळ दिसून येत असल्याचे सांगण्यात येत आहे या मुळे यवतमाळ जिल्हा प्रशासन पूर्णपणे भ्रष्ट झाल्याचे स्पष्ट होत आहे. कारण हजारो घरकुल खाजगी घरे पूर्ण झाली त्यांच्या बांधकामाच्या ठिकाणी वाळूचे ढीग दिसून येत असतानाही एकही अधिकारी याच साधी तपासणी तर दूरच साधी विचारणाही करतानी दिसत नाही दिसून आले नाही या वरून प्रशासन पगारा करिता व कमिशन करिताच काम करीत असल्याचे सर्वसामान्यान कडून बोलल्या जात आहे.या प्रकरणात वरिष्ठांनी याची शहानिशा करून संबितावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
