वर्धा येथे गवळी समाज मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळ्याचे आयोजन
वर्धा येथे गवळी समाज मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळ्याचे आयोजन 13 जुलै 25 ला सकाळी 11=30 मी.दादाजी धुनिवाले सभागृह नागपूर रोड येथे आयोजित करण्यात आला या भव्य गवळी समाज मेळावा व गुणवंत विद्यार्थी यांचा गुण गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी .केंद्रीय मंत्री तथा अध्यक्ष ओबीसी आयोगाचे मा.हंसराज भैया अहिर तर विशेष उपस्थिती अमोल दादा गवळी पोलिस निरीक्षक सोलापूर,भावनाताई कुंदन वैद्य पोलिस उपनिरीक्षक मुबई हे राहणार या वेळी प्रमुख उपस्थिती गवळी समाजाचे प्रदेश अध्यक्ष हिरामण अप्पा गवळी,बाबासाहेब गळहाट माजी प्रदेश अध्यक्ष,गोपाळराव अवथळे प्रदेश उपाध्यक्ष, उद्ध्वरा गाडेकर प्रदेश उपाध्यक्ष,अशोकजी मंडळे प्रदेश सचिव,आनंदराव कालोकार माजी प्रदेश उपाध्यक्ष, वैशालीताई अवथळे प्रदेश अध्यक्षा महिला गवळी समाज,प्रवीण भाऊ स्व.किसनराव हुंड्डिवाले प्रदेश अध्यक्ष युवा गवळी समाज, उत्तमराव काळे जिल्हा अध्यक्ष गवळी समाज नागपूर, सदाशिवराव खडगी जिल्हा अध्यक्ष गवळी समाज अमरावती,नारायणराव फुलाते जिल्हा अध्यक्ष गवळी समाज यवतमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समाज मेळावा व गुण गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम गवळी समाज महिला गवळी समाज युवा गवळी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमास समस्त गवळी समाज बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन मोरेश्वर गळहाट यांनी केले आहे.
