दारूच्या नशेत चालकाने सवेरा ट्रॅव्हल्स चढवली डिव्हायडर वर मोठा अपघात टळला
उमरखेड ते यवतमाळ येणारी
सवेरा ट्रॅव्हल्स क्र.एम एच ०८/ डब्ल्वू ७५३१ सवेरा हि ट्रॅव्हल्स सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक डिव्हायडर वर चढली यात बसलेले पन्नास ते साठ प्रवासी घाबरून गेले आणि ओरडा ओरड सुरू झाली,सुदैवाने ट्रॅव्हल थांबल्या गेली काय घडलं कस घडलं हे पाहण्या करिता सर्व प्रवासी खाली उतरले पाहते तर चालक डुलक्या देत होता तेव्हा कळलं की चालक हा दारू पिऊन ट्रॅव्हल्स चालवत होता सुदैवाने मोठा अपघात टळला सर्वच प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत दिसून येत होते. हि बाब अत्यंत गंभीर असून अशा अवैध्य प्रवासी वाहतुकी कडे कुणीही फिरकून पहात नाही कारण आर्थिक हित संबंध जोपासून असल्याने चक्क प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे याचे कुणालाही काही सोयर सुतक नसल्याने अनेकांचे बळी जात आहे मात्र सर्रास खुलेआम अवैध्य प्रवासी वाहतूक चालू आहे यवतमाळ ते उमरखेड मार्गावर ८ ते १० अशा ट्रॅव्हल्स सुरू आहे या अगोदरही अनेक अपघात झाले आहे मात्र ही वाहतूक थांबत नाही कारण आर्थिक संबंध हि तितकेच घट्ट झाल्याने सर्व सामन्याच्या जीवाचे कुणालाही मोल राहिले नाही प्रशासन आता तरी जागे होईल का असा सवाल उपस्थित होत आहे.
