यवतमाळ दि.27 जून 2025 रोजी भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन – समाजासाठी एक प्रेमपूर्ण आणि जबाबदारीचे पाऊल
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा यवतमाळ आणि धैर्य सोशल वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिर हा उपक्रम अत्यंत यशस्वी, प्रेरणादायी आणि समाजोपयोगी ठरला.
या शिबिराचे उद्घाटन भारतीय स्टेट बँक यवतमाळ वक्षेत्रीय व्यवस्थापक यवतमाळ मां प्रशांत एकुडे ,मुख्य शाखेचे मुख्य व्यवस्थापक मा. मिलिंद नाईक , मानव संसाधन व्यवस्थापक मा. कुणाल दीप यांच्या हस्ते करण्यात आले.
बँकेचे अधिकारी, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येऊन माणुसकीचा उत्तम आदर्श निर्माण केला.
एकूण 93 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान करून मानवतेचा सर्वोच्च आदर्श प्रस्थापित केला. त्यांच्या या योगदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचणार आहेत, ही खूप मोठी सामाजिक देणगी आहे.
या शिबिरामध्ये विशेषतः खालील मान्यवरांनी शिबिरस्थळी भेट देऊन प्रोत्साहन दिले:
–सर्व सेवाभावी संस्थांचे समन्वयक मा. प्रा. घनश्याम दरने सर, युवा जागर ट्रस्ट, राहुल दाभाडकर, निःस्वार्थ सेवा फाऊंडेशन, युनिटी फाऊंडेशन, नारी रक्षा समिती व पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे जिल्हाध्यक्ष विनोद दोंदल, संकल्प फाऊंडेशनचे रवी ठाकूर
रक्तसंकलनासाठी तांत्रिक सहकार्य
या शिबिरात शासकीय वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय आणि सामान्य रुग्णालय, यवतमाळ येथील रक्तपेढी यांनी संपूर्ण रक्तसंकलनाची जबाबदारी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडली.
टीम सदस्य:BTO: डॉ. सुलतान,SSS:आशिष खडसे,BRO: मोहन तळवेकर,Technical:दर्शन बेलोकार,Attendant: सचिन सोनवाल,BPMT: कु. दिक्षा, शितल, श्रुती मोफत आरोग्य तपासणी शिबिर*
या शिबिरात रुग्णांच्या बीपी, शुगर, थायरॉईड व सामान्य आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. यासोबतच फ्री औषधोपचार देखील देण्यात आले.
हा उपक्रम साई श्रद्धा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सौजन्याने राबवण्यात आला.
वैद्यकीय पथकात सहभागी:वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष व्ही. लढे,डॉ. अपर्णा मोकळे,फार्मसिस्ट सुमित चिकाटे,परिचारिका प्रणाली यवतीकर,मॅनेजर नितीन निवळ
हे शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्या करिता*
भारतीय स्टेट बँक यवतमाळ येथील क्षेत्रीय व्यवस्थापक यवतमाळ मा. प्रशांत एकुडे मुख्य शाखेचे मुख्य व्यवस्थापक मा. मिलिंद नाईक ,मानव संसाधन व्यवस्थापक मा. कुणाल दीप सर
यांचे या संपूर्ण उपक्रमात अत्यंत महत्त्वाचे आणि मोलाचे योगदान होते.
त्यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन, सततची सकारात्मक साथ आणि सक्रिय सहकार्य यामुळेच हे रक्तदान शिबिर भव्य, दिव्य व यशस्वी स्वरूपात पार पडले. संस्थेच्या वतीने त्यांचं मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहे.
धैर्य सोशल वेल्फेअर फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष कमलेश ग. बघेल,उपाध्यक्ष अमोल फुंदे,सदस्य अविनाश खोब्रागडे,सूरज रामटेके,मनोज तेलंग,शाम थापा,मोहन शिंदे,संतोष नगराडे,पवन बन,विनोद पांढुळने,युवा जागर ट्रस्टचे अध्यक्ष. किशोर बाभूळकर,यांनी या कार्यात विशेष परिश्रम घेतले.
महिलांचा विशेष सहभाग
विविध संस्थांचा समर्पित सहभाग
नागरिकांची जबाबदारीची जाणीव
या सर्व घटकांनी हे शिबिर केवळ यशस्वीच नव्हे तर हृदयस्पर्शी आणि समाजजागृतीपर बनवलं.
धैर्य सोशल वेल्फेअर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. कमलेश ग. बघेल यांनी भावनिक शब्दांत सांगितले –
“हा उपक्रम केवळ रक्तदानापुरता मर्यादित नाही, तर ही एक सामाजिक जबाबदारीची साखळी आहे.
माणूस म्हणून आपल्या थोड्याशा रक्तदानातू जर कुणाचं आयुष्य वाचू शकत असेल, तर रक्तदान शिवाय दुसरा पर्याय नाही.”
_भारतीय स्टेट बँक यवतमाळ मुख्य शाखा व धैर्य सोशल वेल्फेअर फाऊंडेशन परिवार वतीने सर्व सहभागी मान्यवर, संस्था, नागरिक आणि रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार करण्यात आले
