Home यवतमाळ आठ दिवसांपासून ‘नंदिनी’चा शोध लागलाच नाही!

आठ दिवसांपासून ‘नंदिनी’चा शोध लागलाच नाही!

112

आठ दिवसांपासून ‘नंदिनी’चा शोध लागलाच नाही!

लाडखेड पोलीसांकडुन अजुनही तपास सुरू.नंदीनीच्या पालकांची सुरु आहे दारोदारी विचारपुस

(कु. नंदीनी गजानन वाघाडे)दिनांक:- २९/०६/२०२५ यवतमाळ

आपल्या आजीच्या गावावरुन परत यायला निघालेली कु. नंदीनी (१७ वर्षे) हि दि. २२ जून पासून अजुनही आपल्या घरी न पोहोचल्याने उद्विग्न पालकांची दारोदारी विचारपुस सुरू आहे. लाडखेड पोलीसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असला तरी अजुनही तिचा शोध लागलेला नाही.

काही दिवसांपूर्वी भारी गावातील नंदिनी गजानन वाघाडे (१७ वर्षे) हि नेहमीप्रमाणे आपल्या आजीकडे चिकणी (कामठवाडा) येथे गेली होती. काही दिवसांनंतर दि. २२ जून रोजी ती चिकणी येथून आपल्या भारी गावाकडे परत निघाली होती. नंदिनी गेल्यानंतर काही वेळाने तिचे आजीने तिचे आईला फोन करुन ती पोहोचली कि नाही, याबाबत विचारणा केली असता, ती घरी पोहोचलीच नाही, असे तिचे आईने सांगितले. त्यामुळे तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. परंतु ती कुणाकडेही आढळुन न आल्याने, सरतेशेवटी नंदिनीची आई सौ. अर्चना गजानन वाघाडे रा. भारी हिने दिलेल्या तक्रारीवरून लाडखेड पोलीस स्टेशनला अपराध क्र. २२५/२०२५ नोंदविण्यात आला असुन नंदिनी चे कुटुंबियांनी भारी गावातील रोहीत रामा तोडासे (२५) यांचेवर संशय व्यक्त केला असुन प्रेमप्रकरणातून नंदिनी चे अपहरण केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) नुसार गुन्हा दाखल केलेला आहे.

आजरोजीस ८ दिवसांचे वर कालावधी उलटुन गेल्यानंतरही नंदिनीचा कोणताही सुगावा लागत नसल्याने तिचे पालक उद्विग्न परिस्थितीत दारोदारी जाऊन विचारपुस करीत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी लवकरात लवकर नंदिनी चा शोध लावावा, अशी मागणी नंदिनी चे कुटुंबियांनी केली आहे

Copyright ©