मेटीखेडा ते राळेगाव रस्त्याची दैनिय अवस्था बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
प्रवाशांचे हाल.
मेटीखेडा ते राळेगाव मार्गे डोंगरखर्डा या रस्त्याचे दुरस्तिकरणाचे काम सुरू असुन सबंधित बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशी वर्गाचे मोठे हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मेटीखेडा ते राळेगाव हा सिमेंट रस्ता बनवीत असताना वळणमार्ग व्यवस्थित काढला नसून काढलेला वळणमार्ग दर्जेदार नसल्याने पावूस येताच रस्त्यात वाहन फसत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दिनांक २६जुन रोजी पावसाने हजेरी लावल्याने संपुर्ण रस्ता चिखलमय झाला तर या मार्गावर अनेक किरकोळ अपघातासह रस्त्याचे मधोमध वाहन फसल्यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.
सदर बावीस किलोमिटर अंतर रस्त्याचेबांधकाम करताना पावसाळ्यात वाहांनधारकसह प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता रस्ता बांधकामाची कोणतीही एक बाजु पुर्ण करणे गरजेचे होते मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजु फुटीर करून ठेवल्यामुळे वाहणे खिळखिळ होत असून त्याचा नाहक अधिक भुर्दंड वाहन मालकांना सहन करावा लागत आहे.
आपल्या ठेकेदारी मर्जीनुसार संतगतीने सुरू असलेले रस्त्याचे काम व नालायक वळणमार्ग यामुळे दरोराज होत असलेल्या अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस अधिक वाढ होत असल्याने या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहन चालकाला तारेवरची कसरत तर प्रवाशी वर्गाला आपलाजिव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.
सबंधित विभागाने या महत्त्वपूर्ण घटनेची दखल घेवून योग्य तो वळणरस्ता बनवुन रस्त्याचे पुढील काम एकतर्फी करावे व होणारे अपघातसह रस्ता बांधकामामुळे प्रवाशांच्या जीवाशी होत असलेला खेळ थांबविण्याची मागणी मेटीखेडा डोंगरखर्डा, राळेगाव परिसरातील जनतेकडून जोर धरत आहे.
