आता कॅन्सरवरील केमो थेरेपी यवतमाळातच
मुंगसाजी माऊली कॅन्सर हॉस्पीटलमध्ये सेवा : डॉ. आशुतोष गावंडे यांच्या अथक परिश्रमानंतर
कर्करोगासारख्या महाघातक आजारावर आता यवतमाळमध्येच मोफत उपचार शक्य झाले आहेत. दीर्घकाळापासून वर्धा, नागपूरसारख्या शहरांमध्ये जावे लागत असलेली केमो थेरेपी सेवा आता मुंगसाजी माऊली कॅन्सर हॉस्पिटल, दाते कॉलेज रोड, यवतमाळ येथेच सुरू झाली आहे. ही सेवा खास डॉ. आशुतोष गावंडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे साकार झाली असून जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी ती एक मोठी दिलासादायक बाब ठरत आहे.
कॅन्सर (कर्करोग) हा आजार जटील प्रकारचा आहे. तो दिर्घवेळ प्रत्येकाच्या सोबतच असतो. त्यावर मात करता येत नाही, पण तो उपचाराने बरा होऊ शकतो. व्याधीतुन मुक्तता देखील होते. त्यामुळे प्रथमत: त्याचे निदान होणे अत्यंत आवश्यक असते. हा आजार, खर्चाच्या दृष्टिने सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने परोवडणारा नाही. अनेक वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नानंतर जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी आता यवतमाळ शहरातच मोफत केमो थेरेपी सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंुंगसाजी माऊली कॅन्सर हॉस्पीटलचे डॉ. आशुतोष गावंडे यांनी केले आहे.
डॉ. आशुतोष गावंडे (M.B.B.S., M.D., टाटा हॉस्पिटल, मुंबई Consultant Clinical Oncologist), डॉ. गावंडे सर यांचे कॅन्सर उपचार क्षेत्रातील अनुभव विशेष उल्लेखनीय आहे. त्यांनी यापुर्वी अनेक रुग्णांना कॅन्सर आजारातून केमो थेरेपी द्वारे मुक्त केले आहे. यवतमाळातील सर्वसामान्य रुग्णांना यापुर्वी केमो थेरेपीसाठी वर्धा, नागपूर किंवा अन्य ठिकाणी जावे लागत असे. आता त्यांची परवड थांबणार असून आपल्याच यवतमाळ शहरातील दाते काॅलेज रोडवर असलेल्या मुंगसाजी माऊली हॉस्पीटलमध्ये निशुल्क सेवा मिळणार आहे.
आरोग्य हे संपत्तीचं खऱ्या अर्थानं रूप आहे आणि आता ते सर्वसामान्य जनतेसाठी अधिक सहज उपलब्ध झालं आहे. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित प्रयत्नांतून दरवर्षी प्रत्येक कुटुंबासाठी ₹ ५ लाखांपर्यंतचे मोफत आरोग्य संरक्षण मिळत आहे. याच योजनेंतर्गत ‘मुंगसाजी माऊली कॅन्सर हॉस्पिटल’ येथे तब्बल १३५६ उपचार आणि शस्त्रक्रिया मोफत दिल्या जात आहेत.
५ लाखांचे मोफत आरोग्य कवच!
एकत्रित आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत १३५६ उपचार व शस्त्रक्रिया देण्यात येणार असून प्रति कुटुंब, प्रति वर्ष ५ लाख आरोग्य संरक्षण मिळणार आहे. कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही, गरीब व गरजू रुग्णांसाठी आयुष्य बदलणारी संधी आहे. अधिक माहितीसाठी आरोग्य मित्रा’शी संपर्क साधावा. नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक: १४५५५ / १८०० १११ ५६५ / १५५३८८ / १८०० २३३३ २००
