नेत्रहिनांनी गाजवली लिगांयत पाडवा पहाट
{हितसंवर्धक मंडळ, वसुधा प्रतिष्ठान, बसव क्लब,लिंगायत महिला मंडळाचा उपक्रम}
चैत्र गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात मंदमंद सुरांच्या यंदाची लिंगायत पाडवा पहाट रसिक श्रोत्यांच्या मनात अभावितपणे कोरल्या गेली. यवतमाळच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणाऱ्या मैफलीमध्ये महत्त्वाचा वाटा असणाऱ्या वीरशैव हितसंवर्धक मंडळ, वसुधा प्रतिष्ठान,बसव क्लब, लिंगायत महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत लिंगायत पाडवा पहाट या सुरबहार भक्तिमय संगीतमय कार्यक्रमाला मराठी नववर्षाच्या रम्य पहाटे महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक भवन, यवतमाळ येथे अद्भुत प्रतिसाद लाभला.सेवासमर्पण प्रतिष्ठान आणि दिव्यांग समिती प्रस्तुत नेत्रहिन गायकांच्या सुरेल आवाजात भक्तीमय सुरबहार पाडवा पहाट आयोजित करण्यात आली, डोळसांना पण लाजवेल असे एकापेक्षा एक सरस असे गाणी गाऊन लिंगायत पाडवा पहाट मध्ये प्रथमच नेत्रहीन गायकांच्या सुरेल आवाजात सगळ्या श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष हितसंवर्धक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. अशोकराव मेनकुदळे, प्रमुखपाहुणे सेवासमर्पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत बनगीनवार,
उपाध्यक्ष सुरेशजी राठी,डॉ अलोक गुप्ता, दिपक बागडी हितसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष डॉ. जयेश हातगांवकर, सचिव निलेश शेटे, गिरीष गाढवे, चंद्रशेखर उमरे, कल्पनाताई देशमुख ईत्यादी. मान्यवरांच्या हस्ते द्विप प्रज्वलन झाले, यानंतर पाडवा पहाट ह्या भक्तीमय कार्यक्रमाला सुरवात झाली, ह्यामध्ये रिमा तोडकर ह्या नेत्रहिन गायिकेने सादर केलेल्या ह्या गणेश वंदन ने लिंगायत पाडवा पहाट या संगितमय कार्यक्रमाची सुरुवात झाली. देवातुझ्या दारी आलो हे गित सादर करित यश गायकवाड ह्यांनी कार्यक्रमाला रंगत आणली, सुंदर ते ध्यान, कानडा राजा पंढरीचा,अंजनीच्या सुता,फुललेरे क्षण,कभी राम बनके,विठु माऊली,ऐैसा डमरू बजाया भोलेनाथने,
खेळ मांडली वाळवंटी, सुंदर ते धान्य विटेवरी, केशवा माधवा, शोधसी मानवा, मन लागोरे, कानडाहो विठ्ठलु, ह्या एकापेक्षा एक सरस गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वरचेवर चढत गेली सत्यम शिवम सुंदरम हे अद्वितीय गाणे गाऊन रिमा तोडकर हिने पाडवा पहाट ह्या कार्यक्रमाला सर्वोच्च उंचीवर नेऊन ठेवले, ह्यानंतर हरी म्हणा,गोविंद म्हणा गीताने वातावरण भक्तीमय करून टाकले, संपुर्ण कार्यक्रमामध्ये पारंपारिक पोषाख परिधान करून आलेल्या जान्हवी मनिष शेटे, व संस्कृती सचिन शेटे ह्या चिमुकल्या सर्वांचे लक्ष वेधुन घेत होत्या, पद्मश्री हातगांवकर ह्यांनी सुंदर असे पाडव्याच्या निमित्त स्वरचीत कवितेचे वाचन केले, यश गायकवाड ज्ञानेश्वर धबडगे, रीमा तोडकर, हनुमान डहाणे तबलावादक ऋषिकेश तिगोटे योगेश शेळके सुनिता कुलसंगे अतुल कावडे ,सोनम ठाकरे
ईत्यादी गायकांनी एकापेक्षा एक सरस असे गाणी गायले, ह्यामध्ये प्रा.तेजश्री मानेकर, ह्यांचे लिंगायत महिला मंडळाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणुन तसेच उपाध्यक्ष पदी प्रा.डॉ.सिमा शेटे,सचिव पदी सौ.रेणुका कुल्ली निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. या बहारदार अशा लिंगायत पाडवा पहाट ला शेवटपर्यंत श्रोत्यांची गर्दी कायम होती. “आज बाई जीव माझा” गायलेल्या ह्या सुंदर अश्या गवळनीने पाडवा पहाट कार्यक्रमाची सांगता झाली.
त्यानंतर प्रशांत बनगीनवार ह्यांनी सेवासमर्पण प्रतिष्ठानच्या कार्या विषयी श्रोत्यांना माहिती दिली,डॉ जयेश हातगांवकर ह्यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले, यादरम्यान या बहारदार कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन सौ. तेजश्री मानेकर तर आभार प्रदर्शन निलेश शेटे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता वीरशैव हितसंवर्धक मंडळ, वसुधा प्रतिष्ठान ,बसव क्लब,सह डॉ.किशोर मांडगावकर,गजानन हातगांवकर, रमेश केळकर,भुषण तंबाखे,राजु कुऱ्हेकर,विनोद नारिंगे,अनिल बेगडे संजय कोचे, डॉ.मंगेश हातंगावकर, मंगेश शेटे, बाळासाहेब दिवे, अनिल बेगडे ,निर्मल ठोबरे, नागेश कुल्ली, अमर केळकर, भुषण तंबाखे, गजानन हातगांवकर, राजेश मानेकर, महेश्वर गाढवे,निर्मल ठोंबरे,विजय देशमुख, प्रा.राजेश मानेकर, राजु मेनकुदळे, जयंत मोझरकर,अजय खारपाटे,अशोक तेले,अशोक जिवरकर,सौ. पद्मश्री हातगांवकर,सौ.सिमा शेटे नवलाखे, सौ.उज्वला नारिंगे ,सौ.उषा कोचे ,सौ.माधवी मोझरकर,सौ.शिल्पा बेगडे,सौ.माधुरी माटे,सौ.रेणुका कुल्ली,सौ.जयश्री जिवरकर, सौ.अश्विनी ठोंबरे,सौ.शिला तेले ईत्यादींचे सहकार्य लाभले.
