विविध तेत एकता हीच आपल्या महाराष्ट्र ची खरी संस्कृती – शहेजाद शेख
शहेजाद शेख अल्पसंख्यांक आर्णी तालुका अध्यक्ष, रा. काँ. प शरदचंद्र पवार
महान व्यक्तींना आपण विशिष्ट जातीचे बनवून करंटेपणा दाखवीत आहोत. महात्मा जोतीबा फुले माळी होते म्हणून माळी लोकांनी त्यांचा उत्सव करणे, छत्रपती शिवाजी महाराज मराठी होते म्हणून त्यांची पूजा मराठ्यांनी करणे, लोकमान्य टिळक ब्राह्मण होते म्हणून त्यांचा उत्सव ब्राह्मणांनी करणे, हे करंटेपणाचे लक्षण आहे. हे मोठे लोक विशिष्ट जातीत जन्मले असतील, पण त्यांचे जीवन सर्व समाजासाठी होते, त्यांच्याविषयी सर्व समाजाने आदर दाखवून त्यांच्या शिकवणुकीचे अनुकरण करावे.
हिंदुस्थान) पूर्वी एक असला तरी वगवगळा सामाजिक मने, वेगवेगळी सामाजिक जगे यामुळे शेकडो वर्षे येथे जी परिस्थिती निर्माण झाली ती बदलण्यासाठी, एका समाजाला दुसऱ्या समाजापासून वेगळ्या ठेवणाऱ्या सामाजिक विषमतेच्या ज्या भिंती आहेत त्या आपण पाडून टाकल्या पाहिजेत, असे मला वाटते. आता आपण एक मन, एक समाज अशी भावना निर्माण केली पाहिजे, एक सामाजिक पुरुष निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
सामाजिक विषमतेच्या भावनेचा आमचा जो वारसा होता तो आम्ही टाकून दिला पाहिजे, गाडला पाहिजे, आणि एका नव्या वातावरणाचे, प्रेमाचे, सहकाराचे चित्र या देशात उभे राहिले पाहिजे, महाराष्ट्रात उभे राहिले पाहिजे.
तुम्ही आणि मी भारतीय असून तुमचे आणि माझे एकमेकांशी जवळचे नाते आहे. या प्रांतात राहणारे नागरिक म्हणून तुमचा आणि माझा एकमेकांवर एक प्रकारचा हक्क आहे. शेकडो वर्षे या भूमीत आपण राहिलो, रगडलो गेलो आणि शेवटी येथेच तुमची-माझी सगळ्यांची हाडे पडणार आहेत, जळणार आहेत. परंतु कर्मभूमी म्हणून, मायभूमी म्हणून ज्या भूमीवर आपण वाढलो आहोत आणि जगतो आहोत, तिचे काम करण्याचे, समान हक्काचे तुमचे माझे बंधू-बंधू म्हणून जे नाते आहे त्या नात्याने, आपण एकमेकांजवळ गेले पाहिजे, एकमेकांची मने समजून घेतली पाहिजेत, एकमेकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
माझ्या मते, हेच खरे स्वातंत्र्याचे वातावरण आहे, हीच खरी वैचारिक स्वातंत्र्याची हवा आहे. वैचारिक स्वातंत्र्याच्या पाठीमागे एक मानसिक परिस्थिती असावी लागते. जेव्हा मनुष्य आपले स्वतःचे म्हणणे खरे आहे यावर विश्वास ठेवतो, पण त्याचबरोबर दसऱ्याचेही खरे असण्याचा संभव आहे, हीही शक्यता मानतो, तेव्हाच खरे विचारस्वातंत्र्य संभवते.
गुडी पाडवा, रमजान ईद, राम नवमी, भगवान महावीर जयंती आंबेडकर जयंती आणि गुड फ्रायडे हे सर्व सण एकत्र येणं म्हणजे हीच तर आपली संस्कृती, आपली एकता
भगवान – रब – अल्लाह – ईश्वर
सगळेच एकच संदेश देतात –
प्रेम करा, एकत्र राहा आणि आनंद साजरा करा !
या पवित्र दिवशी, आपल्या जीवनात नवीन उत्साह, सुख, शांतता आणि बंधुभाव नांदो. आपण सारेजण एकत्र येऊन, संपूर्ण समाजाला एकतेचा, समतेचा आणि प्रेमाचा संदेश
