नॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेत गिरीराज काळे भारतातून तिसरा, मेन्स फिजिकल स्पर्धेत चौथा
नुकत्याच इंडिया बॉडीबिल्डिंग व फिटनेस फेडरेशन तर्फे आयोजित केलेल्या साई सिल्वर लॉन स्पर्धे मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील गिरीराज श्रीकांत काळे यांनी
शिर्डी येथे दि,२४/३ते २६/३/२०२५ ला पार पडलेल्या नॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेत येथील गिरीराज श्रीकांत काळे हा ज्युनिअर कॅटॅगिरी मधुन बॉडी बिल्डिंग स्पर्धे मध्ये भारतातुन तीसरा व मेन्स फिजीकल्स स्पर्धेत भारतातुन चौथा क्रमांक प्राप्त केला गवळी समाजातील एकमेव तरुणाने समाजाला एक वेगळी दिशा देत पालकाचे,गुरूचे गावाचे व देशाचेही नाव लौकीक केल्याने गिरीराज हा समाज भूषण ठरला आहे या सन्मानाने त्याचे समाजाच्या व जिल्ह्याच्या विविध भागां मधून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे गिरीराज हा गवळी समाजातील एकमेव तरुण या स्पर्धेत गेल्याने सर्वत्र आचर्य व्यक्त करीत आहे हे यश संपादन केल्याने समाजातील अनेक तरुणांना एक दिशा मिळणार असून याचे सर्वस्वी श्रेय गिरीराज यांना जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
