Home यवतमाळ दहेगाव येथे भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाची सांगता

दहेगाव येथे भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाची सांगता

72

दहेगाव येथे भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाची सांगता

राळेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या दहेगाव येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही श्री विठ्ठल रुक्मिणी वार्षिक उत्सव सोहळ्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संगीतमय श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाची सुरवात दि २० मार्च २०२५ गुरुवारला झाली व दि २८ मार्च २०२५ शुक्रवारला समाप्ती झाली भागवत कथेचे वाचन श्रीमद् भागवतचार्य ह भ प रमेशपंत आखरे महाराज आर्वी यांच्या समृद्ध वाणीतुन सकाळी ९ ते१२ वाजेपर्यंत व दुपारी ३ ते ६ पर्यंत या कालावधीत करण्यात आले

श्रीमद् भागवत कथा निमित्त सामुदायिक , ध्यान,काकडा,रामधून ग्रामगीता, खंजिरी भजन कीर्तन सामुदायिक प्रार्थना ,रांगोळी स्पर्धा श्री कृष्णा जन्मोत्सव, गोवर्धन पूजा विवाह उत्सव दैनंदिन हरीपाठ, भारुड, सामुदायिक प्रार्थना, दैनंदिन किर्तन, इत्यादी विविध विषयांवर प्रवचन प्रबोधन राधे राधेच्या गजरात मंदिर परिसर भक्तिमय झाला होता या सप्ताहत्यात दैनंदिन किर्तन ह भ प सदाशिव महाराज परचाके, ह भ प नारायण महाराज पडोळे, ह भ प सुरज महाराज पोहकर,ह भ प उमेश महाराज जाधव, ह भ प सुवर्णा ताई पिंपळकर ह भ प कृष्णा महाराज घोडके ,ह भ प आशिष महाराज बटप नामवंत कीर्तनकाराची किर्तन झाले व २७मार्च २०२५ रोजी काल्याचे किर्तन ह भ प रमेशपंत आखरे महाराज यांनी केले व सायंकाळी ५ वाजता पासून महाप्रसाद सुरुवात झाली व महाप्रसादाचा लाभ बाहेरगावातील नागरिक व सर्व दहेगाव वासी यांनी घेतला व रात्री ९ वाजता ह भ प खुशाल महाराज वैध यांनी भारुड सादर केले तसेच २८ मार्च २०२५ला सकाळी १० वाजता पासून श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पासून गावातील मुख्य मार्गांनी टाळ मृदंगाच्या गजरात श्री विठ्ठल रुक्मिणी भव्य पालखी सोहळा काढण्यात आला पालखी सोहळा मध्ये सर्व दहेगाव वासी मोठ्या संख्येने व गावातील भजन मंडळ बाहेरगावातील भजन मंडळ यांनी उपस्थित राहुन हरीनामचे भजन टाळ हाती घेऊन केले गावातील महिलांना आपल्या घरासमोर पाणी मारुन रांगोळी काढून शोभा वाढवली व पालखीचे पूजन केले गावातील प्रत्येक रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती व जगनाथ महाराज चौकात लक्ष्मण सातपुते मित्रपरिवारने नाश्त्याची व्यस्ता केली तसेच महेश उताणे यांनी चहा थंड पाण्याची व्यवस्था केली तसेच शिवाजी चौकात शिवप्रतिष्ठान युवा मंच ग्रुप दहेगाव यांनी नाश्त्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली व गुरुकृपा उपहारगृह दहेगाव यांनी चहाची व्यवस्था केली व किशोर पोटे यांनी थंड पाण्याची व्यवस्था केली होती तसेच पालखी सोहळा 5 वाजता समाप्त झाला नंतर आरती करून लाही पोहेचा प्रसाद वाटप करण्यात आला तसेच पालखी सोहळ्यात सहभागी सर्व भजनी मंडळी ला भागवत उत्सव समितीने त्यांच्या मानसन्मान करून सन्मानित केले भागवत सप्ताह करिता आलेल्या महाराज व त्यांच्या सर्व सहकार्याची भोजनाची व्यवस्था सकाळी व संध्याकाळी गावातील प्रत्येक एका घरी केली होती व बाहेर गावातील व पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व भजन मंडळाची भोजनाची व्यवस्था माजी सरपंच सुदामराव बलकी यांच्या कडे केली होती व भागवत सप्ताहाचे संचालन किशोर दातारकर यांनी केले कार्यक्रमासाठी भागवत उत्सव समिती हरीपाठ मंडळ शिवप्रतिष्ठान युवा मंच ग्रुप तथा सर्व दहेगाव वासी यांनी परिश्रम घेतले

Copyright ©