पोस्को कायद्यांतर्गत गृहपाल यांना सह आरोपी बनवून अटक करा डॉ.प्रा. मिनाक्षी पानझाडे
दिनांक 25मार्च 25 उमरखेड येथील शासकीय मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह या वस्तीगृहामध्ये नाबालिक मुलगी शनिवारपासून गायब होती .त्या मुलीचे रविवारी दिनांक 23 मार्च 2025 रोजी या नाबालीक मुलीवर बलात्कार करण्यात आला ही मुलगी शासकीय वस्ती गृहात असताना बाहेर कशी पडली? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बाहेर जात असताना अधीक्षक मॅडम वस्तीगृहात उपस्थित होत्या का? नाबालिक मुलीचा अर्ज केल्यावर गृहपाल यांनी मुलीच्या आई-वडिलांना फोन केला का तुमच्या मुलीला पाठवू का! असे आई-वडिलांना प्रश्न विचारले का? ही प्रकीया न करता बाहेर पडली कशी? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होते .या मुलीच्या घरी फोन करून विचारले नाही कारण शासकीय वस्तीगृहामध्ये अधिक्षिका राहत नाही विद्यार्थ्यांना ही नियमावली लागू असल्यामुळे हे करणे आवश्यक होते. पण तसे केले गेले नाही ,कारण
अधिक्षिका या निवासी कधीच उपस्थित राहत नसल्यामुळे आमच्या नाबालिक मुलीचा बळी या ठिकाणी केला या त्याला सर्वस्वी जबाबदार राहने असून यांना आरोपी बनवण्यात यावी अशी आम्ही सर्वसामाजिक संघटनेच्या महिला पदाधिकारी मागणी करत आहोत, यापूर्वी असे अनेक प्रकार त्या ज्या ज्या ठिकाणी नोकरी करत होत्या त्या त्या ठिकाणी दिग्रस पुसद आणि आता उमरखेड येथे घडले आहे .आई-वडील मुलीना वस्तीगृहामध्ये यासाठी टाकतात की गृहपाल त्या ठिकाणी असतात त्यांची योग्य नियंत्रण व चांगले शिक्षण होणार अशी अपेक्षा आई-वडिलांना यांना असते परंतु गृहपाल याबाबतीत असमर्थन ठरल्या त्यामुळे असा हा निंदनीय प्रकार येथे घडला पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी आणि समाजकल्याण अधिकारी यांना या पूर्वी निवेदन देण्यात आले असे अनेक प्रकार या वस्तीगृहात मध्ये घडले आहे तरी यांना नोकरीवरून काढून टाकण्यात यावे तसेच यांना सह आरोपी म्हणून ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी जर वस्तीगृहात गुहपाल या नियमित उपस्थित असत्या तर हा प्रकार घडला नसता उमरखेड मागासवर्गीय मुलींच्या वसती गृहामध्ये कधीही पालक सभा घेतल्या जात नाही मुलींना कुठलंही उद्बोधन केल्या जात नाही मुलींसोबत उर्मट वागणाऱ्या या गृहपालाला ताबडतोब निलंबित करुन यांना सह आरोपी म्हणून अटक करण्यात यावी या नाबालिक मुली सोबत जे कृत्य केलेल्या त्या कृत्याची शिक्षा म्हणून त्यांच्यावर पोस्कोचां गुन्हा दाखल करण्यात यावा त्या पीडितसह आरोपी म्हणून गुहपाल यांना अटक करण्यात यावी व पिडीत मुलीला न्याय देण्यात यावी अशी यावेळेस सन्माननीय पालकमंत्री.सामाजीक न्याय मंत्री महिला आयोग , माननीय जिल्हाधिकारी मा पोलीस अधीक्षक तसेच समाज कल्याण अधिकारी यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले डॉ प्रा मीनाक्षी सावळकर काँग्रेस कमिटी विभागीय अध्यक्ष विद्या पाताल बन्सी निर्मला आडे कल्पना दरवई लता चंदेल दुर्गा पटले संगीता पवार निर्मला आडे शीलाताई पवार कल्पना ठाकरे लताताई. चौधरी दर्शना गेडाम मंदा गुडदे तसेच इत्यादी पदाधिकारी उपस्थित होत्या.
