Home यवतमाळ रविवारी लिंगायत पाडवा पहाटचे आयोजन

रविवारी लिंगायत पाडवा पहाटचे आयोजन

108

रविवारी लिंगायत पाडवा पहाटचे आयोजन

पाडवा पहाट मध्ये प्रथमच नेत्रहिन गायक आणि वादकांचा समावेश

गुढी पाडवा हा भारतीय संस्कृतीतला एक महत्त्वाचा सणे सण आहे. हा हिंदू दिनदर्शिक -प्रमाण चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतुचा पहिला दिवस, वसंत ऋतुची चाहुल देणारा हा गुढीपाडवा,ह्याच दिवसाचे औचित्य साधून वीरशैव हितसंवर्धक मंडळ, वसुधा प्रतिष्ठान, बसव क्लब, आणि लिंगायत महिला मंडळ द्वारा लिंगायत पाडवा पहाट २०२५चे आयोजन रविवार दि. ३०मार्चला सकाळी ६:३० वाजता महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक भवन लोहारा रोड, यवतमाळ येथे करण्यात आले आहे लिंगायत पाडवा पहाट ची आपली परंपरा यावर्षीही कायम राखीत सेवासमर्पण प्रतिष्ठान, आणि दिव्यांग समिती प्रस्तुत प्रथमच नेत्रहीन गायकांच्या सुरेल आवाजात भक्तीमय सुरबहार पाडवा पहाट चे आयोजन करण्यात येत आहे, ह्या नेत्रहिन गायकांच्या समुहात विविध जिल्ह्यातुन. आलेल्या उद्योन्मुख गायकांचा समावेश आहे, संपुर्ण जिल्ह्यासह ईतरही जिल्ह्यामध्ये या गायकांनी आपल्या सुरेल आवाजात आपल्या कलेचा ठसा उमटवलेला आहे,हेच नेत्रहीन गायक आपल्या कलेची साक्ष देणार आहेत. सोबतच नेत्रहिन वादकांची साथसंगत हे या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य असून,

एका अनोख्या,अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्याच्या सुवर्ण संधीचा लाभ

यवतमाळकर रसिकांनी घ्यावा आणि अगत्याने आवर्जून उपस्थित राहून ह्या नेत्रहीन,दिव्यांग गायकांचा उत्साह द्विगुणित करावा असे आवाहन वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष डॉ जयेश

हातंगावकर ह्यांनी केले आहे असे सचिव निलेश शेटे ह्यांनी कळविले आहे.

Copyright ©