डॉ. विवेक चौधरी विदर्भ रत्न पुरस्काराने सन्मानित
आज अमरावती येथे रेडियन्ट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे डॉ. विवेक चौधरी यांना नशामुक्ती व पंचकर्मा ह्यात विशेष योगदान देऊन कार्य केल्याबद्दल विदर्भ रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अमरावती येथे रेडियन्ट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड जि आजपर्यंत समाजात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी 6000 पेक्षा जास्त लोकांना संपूर्ण भारतात पुरस्कार देऊन प्रेरणा देण्यात यश संपादन केले.. दरम्यान, रेडियन्ट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे अमरावती येथे 20 वा अखिल भारतीय महासंमेलन मध्ये डॉ. क्रांती महाजन चीफ एडिटर, डॉ. गरतेज सिंग ब्रार-बठींडा-पंजाब,मा. राठोड साहेब पोलीस अधीक्षक नागपूर रेल्वे, मा. डॉ. प्रा. नरेशचंद्र काठोळे, संचालक IAS एकेडमी, अमरावती तसेच तानाजी मालुसरे यांचे वंशज मा.कुणालजि मालुसरे यांचे हस्ते “नशामुक्ती व पंचकर्मा “ह्या विषयांतविशेष उत्कृष्ट कार्य करण्यासाठी डॉ. विवेक चौधरी यांना विदर्भ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. विवेक चौधरी यांना सलग तिसऱ्यांदा(3) विदर्भ रत्न पुरस्कार प्राप्त केला आहे.. मला प्रेरित करण्यासाठी मा. भाऊराव चौधरी सेवानिवृत्त पोलीस उप अधीक्षक, स्व. शशिकला चौधरी, सौं. सायली चौधरी, HVPM चे संस्थापक मा. प्रभाकरावजी वैद्य, मा. संजयभाऊ तिरथकर, गुरुवर्य म्हणून डॉ. अनिल इसराणी, डॉ. पंकज पवार,मा. राजेंद्रकुमार दूधकोर, स्व. सुरेश चौधरी, राजूभाऊ राऊत, मंगेश सहारे, राजेंद्र चचाने व मित्रमंडळ ई…चे मार्गदर्शन आहे
