Home यवतमाळ पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

73

पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि.18 : भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च पर्यंत वाढविण्यात आली आहे. दहावी मूलभूत शैक्षणिक पात्रता असलेले इच्छुक उमेदवार pminternship.mca.gov.in याअधिकृत वेबसाइट वर विविध इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. या योजनेंतर्गत तरुणांना भारतातील नामांकित 500 कंपन्यांमध्ये व्यावहारिक अनुभव उपलब्ध करून देते.

इंटर्नशिपसाठी अर्जदारांचे वय २१ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे, हायस्कूल, पदवीधर, डिप्लोमाधारक किंवा बीए, बीएससी, बीकॉम, बीबीए, बीसीए, आयटीआय इत्यादी पदवी, पदविकाधारण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. ऑनलाईन किंवा दूरस्थ शिक्षण कार्यक्रमांमध्ये नोंदणी केलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. अर्जदार पूर्णवेळ नोकरी करत नसावा किंवा पुर्णवेळ शिक्षणात नोंदणीकृत नसावा. ही इंटर्नशिप एक वर्ष चालते, त्यामुळे सद्या पूर्णवेळ काम करत नसलेल्या किंवा अभ्यास करत नसलेल्यांसाठी ही एक संधी आहे. इंटर्नला संपुर्ण १२ महिन्यांच्या कालावधीसाठी दरमहा ५ हजार रुपये स्टायपेंड मिळेल. इंटर्नला सामील झाल्यानंतर थेट त्यांच्या खात्यात जमा होणारे ६ हजार रुपयांचे एक वेळ अनुदान देखील मिळेल. इंटर्नला भारत सरकारच्या विमा योजनांतर्गत संरक्षण दिले जाईल. कोणतेही अर्ज शुल्क नाही. अर्जदारास pminternship.mca.gov.in या अधिकृत PMIS वेबसाइटला भेट देऊन अर्ज सादर करता येईल.

पीएम इंटर्नशिप योजना युवकांना विविध क्षेत्रांमध्ये वास्तविक जगातील व्यवसाय अनुभव मिळविण्यास मदत करणे, त्यांची कौशल्ये आणि कामाची तयारी वाढवते. जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प. भ. जाधव यांनी केले आहे.

पंतप्रधान इंटर्नशिप स्कीमसाठी अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ, दि.19 : पंतप्रधान इंटर्नशिप स्कीम २०२५ साठी अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये देशातील ७३८ हून अधिक जिल्ह्यांमध्ये देशातील ३०० हून अधिक टॉप कंपन्यांकडून १ लाख १९ हजार रुपयांहून अधिक किमतीच्या इंटर्नशिप ऑफर केल्या जात आहेत. जिल्ह्यातील युवकांनी यासाठी दि.३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्जदार २१ ते २४ वर्षे वयोगटातील बेरोजगार तरुण असावा. फेरीमध्ये अर्जदार शेवटच्या तारखेपर्यंत त्यांच्या पसंतीच्या जिल्हा, राज्य आणि क्षेत्रानुसार कमाल ३ इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. जर एक ऑफर आवडत नसेल तर उमेदवार दुसऱ्यासाठी अर्ज करू शकता.

 

सन २०३० पर्यंत, दरवर्षी ७८.५ लाख महाविद्यालयांमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक दोन तरुणांपैकी अंदाजे एका तरुणाकडे रोजगारक्षम कौशल्ये नाहीत. हे लक्षात घेऊन सरकारने पीएम इंटर्नशिप योजना सुरू केली होती. यामध्ये तरुणांना कंपनीनुसार कौशल्य शिकण्याची संधी मिळणार आहे. वर्षभराच्या इंटर्नशिप दरम्यान प्रत्येक महिन्याला ५ हजार रुपये दिले जातात.

या फेरीत गॅस, ऊर्जा, बँकिंग आणि वित्तीय सेवा, प्रवास, ऑटोनॉटिक, धातू आणि खाण, उत्पादन, एफएमसीजी, आरआयएल, एचडीएफसी बँक, ओएनजीसी, आयशर मोटर्स, एनटीपीसी, मार्टी सुझुकी आणि एल ॲण्ड टी या क्षेत्रातील अनेक कंपन्या इंटर्नशिप करतील. त्याचवेळी १० वी उत्तीर्ण तरुणांसाठी २४ हजार ६९६ इंटर्नशिपच्या संधी, आयआयटी झालेल्या तरुणांसाठी २३ हजार ६२९, डिप्लोमाधारकांसाठी १८ हजार ५८९, १२वी उत्तीर्ण झालेल्या तरुणांसाठी १५ हजार १४२ आणि पदवीधरांसाठी ३६ हजरी ९०१ इंटर्नशिपच्या संधी उपलब्धआहेत.

उमेदवाराला https://pmintemship.mca.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. जे पुर्णवेळ नोकरीत नाहीत किंवा कुठेही पुर्णवेळ शिक्षण घेत नाहीत. उमेदवाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सरकारी नोकरी नसावी आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. पात्र उमेदवारांनी अर्ज करून सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प. भ. जाधव यांनी केले आहे.

Copyright ©