ट्रॅव्हल्स ला अपघात 25 प्रवासी जख्मी
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत हिवरी हेटी जवळ ट्रॅव्हल्स ला अपघात झाल्याने 25 प्रवासी जख्मी झाले.
सवि.असेकी कोल्हापूर येथून नागपूर कडे जाणारी सैनी ट्रॅव्हल्स एम एच 40, सी एम.5035 हि मध्य रात्री 3.30 मिनिटांनी नागपूर कडे जात असताना
हिवरी हेटी जवळ पुलाला धडक दिली हि धडक इतकी जबरदस्त होती की ट्रॅव्हल्स चा समोरील भागाचा पूर्ण चुराडा झाला तर स्टिअरिंग तुटून चालकां समवेत पुलात पडले तर गाडीचे इंजिन दरवाजात येऊन अडकले यातील पंचवीस प्रवासी गंभीर जखमीं झाले त्या प्रवाशांना नेण्या करिता पाच रुग्ण वाहिकाना पाचारण करण्यात आले तर यवतमाळ ग्रामीण चे निरीक्षक प्रशांत कावरे वाहतूक शाखेचे ज्ञानोबा देवकते त्याच्या चमू सह घटना स्थळी दाखल झाले होते तर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हि घटना स्थळी दाखल झाले होते हा अपघात होताच येथील संदीप चेके यांनी सुखदेवराव साठे,ओंकार चेके, बबन चेके, अविनाश चेके,विशाल चेके संतोष येवले,विनोद येवले,विनोद चेके अशा अनेकांनी मदत कार्यात भाग घेतला तर हिवरी येथे राजू शहारे यांनी तातडीने रुग्ण वाहिका आणून जखमींना रुग्णालयात पोहचविण्याचे काम केले



