नराधम बस चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
नराधम बस चालकाने एका अल्पवयीन मुलीला आमिष देऊन एसटी बसने उमरखेड येथून नांदेड ला नेले व कर्तव्य संपल्याने तेथून नागपूर येथे नेले. त्यानंतर नागपूर येथील आपल्या खोलीवर नेऊन त्या अल्पवयीन मुलीवर जबरीने अत्याचार केल्याची घटना आज उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी नराधम बस चालकास जेरबंद केले आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येतआहे.
संदिप विठ्ठलराव कदम वय-40 वर्ष रा.महात्मा फुले वार्ड उमरखेड असे आरोपीचे नाव आहे. दि.22 मार्च 2025 रोजी 16.30 वा चे सुमारास अल्पवयीन मुलगी बसस्टँड उमरखेड येथे उभी होती. यावेळी बस चालक आरोपी संदिप विठ्ठलराव कदम वय-40 वर्ष रा.महात्मा फुले वार्ड उमरखेड हा अल्पवयीन मुलीस बोलला की तु कुठे जात आहे. तु माझे सोबत नांदेड येथे चल म्हणाल्या वरुन बस मध्ये बसवुन नांदेड येथे गेले. आरोपीची ड्युटी ही नांदेड ते नागपुर या बसवर असल्याने तो अल्पवयीन मुलीला सोबत घेवुन नागपुर येथे निघाला. दि. 23 मार्च 2025 रोजी चे सकाळी अंदाजे 05.00 वा चे सुमारास नागपुर बसस्थानक येथे पोहचले. त्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीला त्याचे रुमवर घेवुन गेला. त्याचे रुमवर कोणीही नसल्याने त्याने जबरदस्तीने अल्पवयीन मुलीवर शरीर संबंध केले. त्यानंतर आरोपी हा अल्पवयीन मुलीला घेवुन सोलापुर बस ने सोलापुर कडे जात आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली टिम तयार केली होती. सदर आरोपी हा उमरखेड बस स्थानक येथे येताच त्यास तातडीने चौकशी कामी ताब्यात घेतले आहे. तसचे अल्पवयीन मुलीचे जबानी रिपोर्ट वरुन पो स्टे उमरखेड येथे अप क्र 177/2025 कलम 137(2), 64(1), 96 BNS, सह कलम 4,8,12 वा.लै.अ.अ.सह कलम 3(2), va, 3 (2)v, 3(1)w(i) (ii) अ.जा. ज. कायदा प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधिक्षक कुमार चिंता , अप्पर अधिक्षक पियुष जगताप साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी बी जे हर्षवर्धन , पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शिंदे, सपोनि सारीका राऊत, पोउपनि धरणे, पोउपनि सागर इंगळे, पोशि, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बी जे हर्षवर्धन हे करीत आहे.



