Home यवतमाळ वनपरिक्षेत्र हिवरी अंतर्गत वनबचाव, जीव बचाव पथनाट्या द्वारे जनजागृती

वनपरिक्षेत्र हिवरी अंतर्गत वनबचाव, जीव बचाव पथनाट्या द्वारे जनजागृती

87

वनपरिक्षेत्र हिवरी अंतर्गत वनबचाव, जीव बचाव पथनाट्या द्वारे जनजागृती

हिवरी वनपरिक्षेत्र अंतर्गत ग्रामपंचायत जवळ वणवा लागण्या संदर्भातील कारणे व त्यावर उपाय आणि घ्यावयाची दक्षता या बाबत पथनाट्याच्या माध्यमातून जणजागृती करण्यात आली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय संस्था नेताजी नगर यवतमाळ.या संस्थाचे कलावंत संच अतिशय प्रभावी पण जनजागृती कार्यक्रम सादरीकरण करण्यात आले आहे.संच प्रमुख गजानन वानखडे,आनंद जवादे, गजानन जडेकर, किशोर घोंगडे, प्रगती वरघट, प्रगती गजबे, रोहित वानखडे व ईतर कलावंत समुह  धनंजय वायभासे उपवनसंरक्षक वन विभाग यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली.वनवनवा व वन्यप्राणी सहजीवन या विषयावर हे जनजागृती पथनाट्य कार्यक्रम राबवित आहे . या कार्यक्रमाला ग्रामीण व शहरी विभागात अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व स्तरातून या कलावंताचे कौतुक होत आहे.

या वेळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सूरज बदूकले,क्षेत्र सहाय्यक व्ही व्ही बांगर, डी पी चव्हाण, एस आर साठे,सुनील लोहकरे,विवेक पांडे, जी.आर.दरवे, आशा गेडाम, पी.सी. फुगे, मेघा तिडके, आराधना अर्बोले, नीलिमा गुल्हाने, वैशाली मिरासे, सपना शहारे, वैशाली चिलीमकर, आकाश डुकरे,नितीन तांबारे, अतुल पाटील,अंकुश तोंडरे, अमोल वाघमारे,संतोष सातपुते, विजय धांदे, गंगाधर मांजरे,शुभम बोंबलके, कु. व्हि जे.सावरकर,सी सी मोहरले.प्रामुख्याने उपस्थित होते

Copyright ©