Home महाराष्ट्र “महिलांनी निर्भिड अन सतर्क राहावं”.ऍड.समिक्षा पाटील यांचे प्रतिपादन

“महिलांनी निर्भिड अन सतर्क राहावं”.ऍड.समिक्षा पाटील यांचे प्रतिपादन

73

“महिलांनी निर्भिड अन सतर्क राहावं”.ऍड.समिक्षा पाटील यांचे प्रतिपादन

संयुक्त राष्ट्रसंघाने ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केल्याच्या घटनेला आज ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आज *आझाद नारी फाउंडेशन यांच्या द्वारे* या जागतिक महिला दिनानिमित्त महिला महोत्सव, म.न.पा.शाळा सदाशिव पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी समान नागरी संहिता समाधान की संघर्ष? या विषयांवर ऍड. समिक्षा पाटील यांनी कायदेविषयक बाजु सविस्तर समजुन सांगितल्या त्यासोबतचं त्या म्हणाल्या, महिलांनी या बदलत्या काळात निर्भिड व तेवढचं सतर्क सुद्धा राहावं.

भारताचा इतिहास हा केवळ राजे-रजवाड्यांचा इतिहास नसून तो श्रमिक-कष्टकऱ्यांचाही आहे व आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने कष्टकरी महिलांच्या या लढ्यांचे समाजाने स्मरण केले पाहिजे हा विचार या महोत्सवात मांडण्यात आला.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाला सध्या आलेले उत्सवाचे स्वरूप दुर्दैवी असून संयुक्त राष्ट्रसंघाच्या घोषणेची पन्नाशी साजरी करत असताना जगभरातील स्त्री कामगारांच्या चळवळी व ८ मार्च या दिवसाचे नाते आज पुन्हा अधोरेखित करण्यात आले.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचें जेष्ठ विधिज्ञ ऍड. पाटील, यांच्या हस्ते सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या महिलांचा लेक साऊंची पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे संचालक मा.राहुलभाऊ सुरवाडे प्रा.अश्विनी नागरगोजे, मा.सुमित्रा सुंदर्या, मा.रोहिणी परिहार, मा. नजमा खान, पुण्यातील विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार, व मोठ्या संख्येने महिलां भगिनी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा लटके नि केले तर आभार रोहिणी मालपाणी यांनी केले.

Copyright ©