Home Breaking News खोरद धरणात दोघांचा बुडून मृत्यू

खोरद धरणात दोघांचा बुडून मृत्यू

82

खोरद धरणात दोघांचा बुडून मृत्यू

रगपंचमीच्या दिवशी तलावावर आंघोळीसाठीजाणे बेतले जीवावर

रंगपंचमीच्या दिवशी आंघोळकरण्यासाठी धरणावर गेलेल्या पाच मित्रांपैकी दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना येथुन जवळच असलेल्या खोरद येथे दिनांक १४ मार्च रोजी घडली.

घटनेतील पंकज झाडे (३६) रा.झाडगाव त.राळेगाव जयंत धानफुले (२९) रा.मार्डी त.मारेगाव असे मृतकाचे नाव आहे.

मृतक व त्याचे मित्र रंगपंचमीचे दिवशी दुपारी खोरद येथील धरणावर आंघोळीसाठी गेले होते, आंघोळीसाठी उतरताच त्यांना धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाच मित्रांपैकी दोघे बुडायला लागताच उर्वरीत मित्रांनी ‘वाचवा वाचवा ‘असा टाहो फोडला असता धरणात मासे पकडीत असणाऱ्याना हा आवाज जाताच त्यांनी सतर्कतेने आपली बोट हाकेच्या दिशेने वळविली दरम्यान त्यांना तिघांना बाहेर काढून वाचविण्यात यश प्राप्त केले.

बुडालेल्या दोघांचा शोध घेने सुरुकेले असताना काही वेळातच मृतक पंकजचा मृतदेह हाती लागला मात्र बरीच रात्र होवूनही दुसऱ्याचा मृतदेह न मिळाल्याने पहिल्या दिवशी शोधकार्य बंद केले होते ,दुसऱ्या दिवशी सकाळी शोध कार्यादरम्यान घटनेतील दुसरा मृतक जयंत धानफुले याचा मृतदेह धरणाचे थडीला तरंगत दिसला.

घटनेची माहिती अंतर्गत येत असलेल्या कळंब पोलिसांना मिळताच कळंबचे ठाणेदार राजेश जाधव व सहकारी यांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा केला व मृतकाचे शव विच्छेदनासाठी रवाना केले.

Copyright ©