बाबासाहेब देशमुख विद्यालय, रुंझा येथे जागतिक महिला दिन साजरा
बाबासाहेब देशमुख विद्यालय, रुंझा येथे ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुमारी मेश्राम व प्रमुख वक्त्या कुमारी बोढाले होत्या. महिलांच्या योगदानाची व महत्त्वाची भूमिका अधोरेखित करणारा हा दिवस शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अनुभव ठरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले. वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू, आय.ए.एस. अधिकारी, वकील, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, एअर होस्टेस, सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ अशा विविध प्रेरणादायी क्रांतीज्योतींची वेशभूषा केली. या वेशभूषांमध्ये प्रत्येक विद्यार्थी आपल्या आदर्श व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक सादर करत महिलांच्या विविध क्षेत्रातील योगदानाचे महत्त्व दर्शवले.
तसेच रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी महिला सन्मान व विविध सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या काढल्या. प्रत्येक रांगोळीमध्ये महिला सशक्तीकरणाचे प्रतीक व प्रेरणादायी संदेश दिले गेले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी महिला दिनाचे महत्त्व स्पष्ट करत महिलांच्या अधिकारांबद्दल, समानतेबद्दल व समाजातील महिलांच्या महत्त्वपूर्ण स्थानाबद्दल आपले विचार मांडले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये महिला सशक्तीकरणाबद्दल जागरूकता वाढली आणि महिलांच्या सामाजिक व सांस्कृतिक भूमिकेविषयी सखोल समज निर्माण झाला. शाळेतील विद्यार्थ्यांनी हा दिवस अत्यंत उत्साहाने साजरा केला, ज्यामुळे महिला दिनाचे औचित्य खूपच उत्तम प्रकारे साधले गेले. मुख्याध्यापक बी. एम .आडे शिक्षक वृंद अतुल चौधरी, यादव घोडे, दिलीप कोकाटे ,बाबाराव गेडाम , विजय पोलेवार अनंता वखरे ,गजानन ठाकरे आदी उपस्थित होते.
