Home Breaking News चिंचोली ग्रामपंचायत सदस्य अपात्र

चिंचोली ग्रामपंचायत सदस्य अपात्र

86

चिंचोली ग्रामपंचायत सदस्य अपात्र

यवतमाळ :- कळंब तालुक्यांतर्गत चिंचोली हे गाव कायम ग्रामपंचायतीचे प्रशासकीय गैर व्यवहार बाबत चर्चेत राहिलेले आहेत त्यालाच अनुशंगुन म्हणून ग्रामपंचायत चिंचोली येथील ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्यापासून मासिक सभेला गैरहजर असल्याची गंभीर बाब अर्जदार अशोक माधवराव वानखेडे यांनी उघडकीस आणून ग्रामपंचायत सदस्य यांना सदस्य पदापासून दूर गेले आहे केले आहे.

 

अर्जदार अशोक माधवराव वानखेडे हे सेवानिवृत्त शिक्षक असल्याकारणाने गावांमधील होत असलेला गैरव्यवहार व भ्रष्टाचार याला आळा घालण्याकरिता वारंवार प्रशासकीय वरिष्ठ कार्यालयात जाऊन पाठपुरावा करीत असतात आणि योग्य ती जनतेच्या हिताची दाद मागित असतात. मौजा चिंचोली येथील जनसामान्य जनतेने निवडून दिलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना आपले कर्तव्य बजावने अनिवार्य होते, त्यासोबतच जनतेने टाकलेला आपल्यावर विश्वास कायम ठेवणे योग्य होते परंतु निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करून मासिक सभेला सातत्याने सहा महिन्याचे वर गैरहजर राहून सदस्य पदामध्ये रस नसल्याचे स्पष्ट निदर्शनास आणून दिले. त्याअनुषंगाने ही बाब अर्जदार यांना माहिती होताच अर्जदार अशोक माधवराव वानखडे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचे कार्यालय गाठत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम ४०(१)(ब) अंतर्गत याचिका दाखल करून आपत्र घोषित करण्यात आले आहे.सबब प्रकरणी ॲड.जित एस.पवार(९०६७०८९१११) यांनी अर्जदार यांचे तर्फे भक्कमपणे बाजू मांडून अपात्रतेचा निर्णय आपल्या बाजूने खेचून घेतला.

Copyright ©