रेती व मुरूम चोरटी तस्करी करणार्यांवर आळा घाला निवेदना मार्फत मागणी
यवतमाळ – जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील अनेक नद्या व नाल्यांतून मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या रेती उपसा सुरू असून, जंगल परिसरातील मुरूम उपसाही बेफामपणे सुरू आहे. यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची व नदीकाठच्या गावांना पुराचा पाण्याची भीती पर्यावरण संवर्धन व विकास समिती यांच्या कडून व्यक्त केली जात आहे. तसेच चोरटी अवैध रेती मुरूम वाहतूक करणाऱ्या विनापरवाना गावातून भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रक आणि ट्रॅक्टरमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
पर्यावरण संवर्धनव विकास समिती राळेगाव यांच्या वतीने उप विभागीय अधिकारी राळेगाव प्रशासनाला दिलेल्या निवेदनात संबंधित विषयावर त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात पुढील मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत, चोरटी अवैध रेती व मुरूम उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, परवान्याशिवाय वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करून संबंधित वाहन जप्ती करण्यात यावी, महसूल व पोलीस विभागाने नियमितपणे कारवाई करून अवैध उपसा रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, स्थानिक प्रशासनाने जनजागृती मोहिम राबवावी इत्यादी समस्येकडे प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास, मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही समितीने दिला आहे. त्यामुळे महसूल व पोलिस प्रशासनाने तत्काळ कारवाई करून अवैध उपसा आणि वाहतूक थांबवावी, अशी मागणी पर्यावरण संवर्धन व विकास समिती मधील जिल्हा अध्यक्ष विनोद दोंदल, कार्याध्यक्ष मनोहर बोभाटे, तालुका अध्यक्ष आशिष भोयर, तालुका संघटना अरविंद कोडापे, तालुका उपाध्यक्ष पद्माकर राऊत इत्यादी उपस्थित होते रेती व मुरूम चोरटी तस्करी नाही व्हावी असे सर्व स्तरातून मागणी होत आहे.
