मार्कंडेय पब्लिक स्कूल कळंब सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
ईश्वर प्रसारक मंडळ राळेगाव
मार्कंडेय पब्लिक स्कूल कळंब तसेच कोठा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 11 जानेवारी 2025 तसेच 12 जानेवारी 2025 करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती आक्काताई , ईश्वर प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव श्री संतोष कोकुलवार सर, संचालिका डॉ. शितल कोकुलवार मॅम, मार्कंडेय पब्लिक स्कूल राळेगाव मुख्याध्यापिका सौ. शामला बल्लेवार मॅम तसेच श्री साईनाथ बल्लेवार सर व श्री ईश्वर पेंद्राम सर उपस्थित होते . विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत 11 जानेवारी 2025 रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, सोलो डान्स स्पर्धा व मी आणि मम्मी कार्यक्रम घेण्यात आला. 12 जानेवारी 2025 ला सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी वेगवेगळे नृत्य प्रकार सादर केले . त्याचप्रमाणे प्रबोधन पर नाटिका सादर केल्या सदर कार्यक्रमाच्या यश प्राप्तीसाठी मार्कंडेय पब्लिक स्कूल कळंब मुख्याध्यापक श्री गणेश छापेकर सर तसेच मार्कंडेय पब्लिक स्कूल कोठा मुख्याध्यापिका सौ. मनीषा फुलसे मॅम व संपूर्ण शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.
शिक्षक – सौ दिपाली जुनगरे , सौ. रुपाली भालकर ,कु. नेहा नेवारे , कु. तेजस्विनी सोनवणे ,कु दिक्षा शिवरकर ,कु. वैष्णवी खासरे, कु. सेजल रामटेके ,कु. प्रगती वाघमारे , सौ. रेखा लांजेवार , सौ स्नेहा गारगाटे , सौ.वनमाला बोरकर , हूमेरा सय्यद, जयश्री राऊत , अश्विनी पालकर, कु. जीविका टाले , कु .रोशनी कोटे , कु. ऐश्वर्या कदम , कुमारी श्रुती शिरभाते.
