जितू पाखरेनी हीवरी करांचे वाजवले बारा
ग्रामदेवता हेंडबा देवि राहाड यात्रे निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन नितीन मिर्झापूरे यांच्या पुढाकारामधून मिर्झापूरे मित्र मंडळाच्या वतीने जगरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम आठ ते बारा वाजे पर्यंत हजारो भाविकांच्या उपस्थितीत जगराता कार्यक्रमाने अनेकांचे मन जिंकले मागील वर्षापासून ग्रामदेवता हेंडंबा देवीच्या रहाड यात्रे निमीत्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.14 जानेवारी भव्य रहाड पेटविण्यात येते या रहाडी मधून म्हणजे निखाऱ्या वरून शेकडो भाविक जातात. या निमित्त पन्नास किलो वजनाचे कबड्डी सामने आयोजीत करण्यात आले.येथील आदिवासीं समाजाचे कुलदैवत म्हणून शेकडो वर्षे पुरातन जागरूक हेंडंबा देवीच्या दर्शनाला सतत भाविंकाची ये जा रहाते पौष पौर्णिमेस रहाड यांत्रे निमीत्त हिवरी येथे आदिवासी समाजाची जणू काही दिवाळी प्रमाणेच आनंद उत्सव साजरा केल्या जाते विवाहित मुली सासरी असणाऱ्या माहेरी येतात,परिसरातील अनेक गावा मधून भाविक या ठिकाणी येतात.या कार्यक्रमा निमित्य आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी भेट दिली त्यांचा ग्रामस्थांन कडून सत्कार करण्यात आला या वेळी नितीनभाऊ मिर्झापूर,सरपंच रंजना भगत,उपसरपंच अभिजित मुर्खे, पो. पा.दिंगाबर शहारे, माजी.उपसरपंच बबन चेके, नामदेवराव मडावी,ऋषभ माहुरे,यांच्या प्रमुख उपस्थितीत मित्र मंडळाचे भूषण धांदे सचिन मानकर, रौनक काकस,अक्षय साठे,विशाल चेके, नाकापार्डी सरपंच प्रेमकुमार धूर्वे, सौरभ वाघाडे, गौरव शहारे,अजय मानकर,अभी शहारे,आशिष भोंडे,आशुतोष खंडागळे,रोशन राणे, इत्यादींनी परिश्रम घेतले.
