दारव्हा होमगार्ड पथका कडुन जिजाऊ जयंती साजरी
दारव्हा होमगार्ड पथकाकडुन साप्ताहिक परेट करून पोलीस स्टेशन च्या पटांगणात राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रा.दिनेश नरवडे सर अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विजय ताजणे सर गणेशजी भोयर चैतन्य ग्रुप चे मार्गदर्शक. अनिलजी लापसेटवार. प्रवीण भोयर सर. उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली. प्रा नरवडे यांनी अध्यक्षीय भाषणात जिजाऊंच्या कर्तृत्वाचे आणि त्यांच्या योगदानाचे महत्व पटवून दिले व गणेशजी भोयर यांनी सुध्दा आपले मत व्यक्त केले तसेच प्रमुख पाहुण्यांनी देखील जिजाऊंच्या नेतृत्वगुणांवर व आधुनिक समाजासाठी त्यांच्या
विचारांची उपयुक्तता यावर आपली मतं मांडली. प्रास्ताविक लीलाधर चौधरी तालुका समादेशक अधिकारी. यांनी केले सूत्रसंचालन वसंता लोंढे पलटण नायक. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ए अर खान वरिष्ठ पलटण नायक. सागर वंडरस्वार पलटण नायक. अब्दुल नईम पलटन नायक.अनिल आडे पलटण नायक.प्रवीण खाडे पलटण नायक. रमेश भगत.भुषन ठवकर.रघुनाथ राठोड.संतोष निमकर.प्रकाश सहारे.ईस्माईल आझाद.मारोती मुदगुलवार.प्रितम राठोड.भगवान शेंन्दे.दिलीप गायकवाड.शेख.यार महम्मद अमित राठोड मंगल डाहाने.निलेश सवाई अमोल राजपल्लु. नंदु शेंडे महीला होमगार्ड शिला मुधाने संगिता चव्हाण. वंदना भालेराव.स्वाती खंगार. अंजीली खटरे.ललीता राठोड कांता सहारे.वैष्णवी अश्विनी सुजाता आदी पुरुष होमगार्ड महिला होमगार्ड मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
