Home यवतमाळ डॉक्टर च्या प्रयत्नाला यश,अखेर त्या गायीला मिळाले जीवदान

डॉक्टर च्या प्रयत्नाला यश,अखेर त्या गायीला मिळाले जीवदान

135

डॉक्टर च्या प्रयत्नाला यश,अखेर त्या गायीला मिळाले जीवदान

प्रतिनिधी

अकोला बाजार अंतर्गत बारड तांडा येथे गायला प्रसूती दरम्यान अडचण येत आहे असे निदर्शनास आले. पशुधन पर्यवेक्षक यांनी पाहणी केली असता गर्भाशयाच्या मुखास सहा पाय दिसून येत होते. साधारणतः प्रसूती दरम्यान दोन पाय लागतात. काहीतरी वेगळी बाब आहे असे कुलदीप पवार, पशुधन पर्यवेक्षक यांना निदर्शनास आले. त्यांनी तातडीने अकोला बाजार येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना संपर्क केला. सदरील गायीची साधारण प्रसूती होऊ शकत नाही असे निष्पन्न झाले. तेंव्हा यवतमाळ येथील प्रसिद्ध सर्जन डॉ. गोपाल चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी, व डॉ. अक्षय चव्हाण यांना बोलाविण्यात आले. त्यांनी प्रथम तपासणी केली असता सिजर करावे लागेल असे ठरविले.

सदरील शस्त्रक्रियेदरम्यान संयुक्त वासरे म्हणजेच जुळलेले दोन वासरे यशस्वी रित्या काढण्यात आले. वासरास दोन तोंड, आठ पाय व दोन्ही पूर्णपणे चीपकलेले होते. शस्त्रक्रियेला ३ तासाचा कालावधी लागला. ही शस्त्रक्रीया पशुधन विकास अधिकारी डॉ. गोपाल चव्हाण, डॉ. अक्षय चव्हाण आणि डॉ. धनश्री शेळके सोबत सा. पशुधन विकास अधिकारी श्री.भगत, पशुधन पर्यवेक्षक आतिश चव्हाण, कुलदीप पवार आणि प्रदीप राठोड यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. गाय सध्या सुखरूप आहे .

Copyright ©