Home यवतमाळ पत्रकारांमुळे लोकशाहीची चळवळ उभी आहे : तहसीलदार संजय जाधव 

पत्रकारांमुळे लोकशाहीची चळवळ उभी आहे : तहसीलदार संजय जाधव 

63

पत्रकारांमुळे लोकशाहीची चळवळ उभी आहे : तहसीलदार संजय जाधव 

समाजसेवक, माजी सैनिकांचा सन्मान.

6 जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दारव्हा तालुक्याचे तहसीलदार संजय जाधव होते, प्रमुख पाहुणे म्हणून लेखक कवी पत्रकार प्राध्यापक हनुमंते ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष ना म जवळकर ग्राहक पंचायत चे तालुकाध्यक्ष प्रा राजेंद्र ठाकूर सेवानिवृत्त नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुंटलवार नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी रमेश राठोड परिवहन अधिकारी अक्षय गजधने ज्यांनी आपली देश सेवा करून मायदेशी परतलेले माजी सैनिक तथा समाज जागृतीचा वसा घेतलेले मुकेश महाराज चुडे मेजर सोनोने यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होतीयावेळी आपले विचार व्यक्त करताना तहसीलदार संजय जाधव म्हणाले की, वर्तमानपत्रातूनच चळवळीला चालना मिळाली. लोकशाहीच्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेल्या बातम्यामुळे लोकशाहीची मोठी चळवळ उभी राहिली. यामुळेच लोकशाहीचा चौथा स्तंभ होण्याबरोबरच प्रसार माध्यम ही लोकशाहीची प्रथम उत्क्रांती आहे. पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून शासन आणि प्रशासन यांना कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन जे काम करता येत नाही अशी कामे वर्तमानपत्राद्वारे पत्रकार यशस्वीरीत्या करत असतात. यामुळे पत्रकारांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील अखेरच्या घटकापर्यंत न्याय मिळवुण देण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्याचबरोबर बदलत्या काळातील पत्रकारितेवर प्राध्यापक हनुमंते सर यांनी विचार व्यक्त केले ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष जवळकर यांनी आधीची पत्रकारिता आणि आजची पत्रिका यातील फरक विशद केला तालुका ग्राहक पंचायत चे अध्यक्ष राजेंद्र ठाकूर सेवानिवृत्त नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुंटलवार प्राध्यापक सुभाष जाधव, मुकेश महाराज चुडे, मेजर सोनोने सदानंद खिल्लारे, यांनीही आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन व प्रास्तविक पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष धीरज राठोड यांनी केले आभार प्रदर्शन दैनिक देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी विवेक ठाकरे यांनी मानले दैनिक साहसिक चे जिल्हा प्रतिनिधी दीपक यंगड, गजानन ठाकरे, शैलेश डहाके, श्याम पांडे, राम पापळकर, प्रमोद लोंढे, राजकुमार महल्ले, अशोक जोगदंड, इत्यादी पत्रकारांनी उपस्थिती लावली यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष धीरज राठोड, राम मते, महेंद्र शेटे, शाम राठोड, चेतन पवार, राम चव्हाण, संदीप राठोड, संतोष राठोड, प्रशांत चव्हाण, ओम चव्हाण, गजल पवार, जया लाभसेटवार, स्वप्निल राठोड , इत्यादी लोकांनी परिश्रम घेतले

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाची औचित्य साधून 6 जानेवारी पत्रकार दिनानिमित्त देशाची सेवा करून मायदेशी परतलेले माजी सैनिक यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान समाज जागृतीचे कार्य करणारे महाराज यांनासुद्धा शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले रुग्णालयामध्ये जाऊन रुग्णांना फळ वाटप करण्यात आले रस्त्याने फिरणाऱ्या गरीब लोकांना थंडीचे दिवस असल्याने त्यांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले पत्रकार दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

Copyright ©