Home यवतमाळ मोफत कराटे आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबीर चे आयोजन

मोफत कराटे आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबीर चे आयोजन

94

*मुलीं व महिलांकरिता स्टेअर्स दुर्गाशक्ती*

मोफत कराटे आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबीर चे आयोजन

स्टेअर्स फाउंडेशन चे संपूर्ण महाराष्ट्रात मुली व महिलांकरिता स्टेअर्स दुर्गाशक्ती या नावाने मोफत कराटे आत्मसंरक्षण प्रशिक्षण चे आयोजन करीत आहे.

महिला व मुलींवर वारंवार होत असलेल्या अन्याय अत्याचार पाहता आपण सर्व कराटे प्रशिक्षकांची नैतिक जबाबदारी बनते कि आपण आपल्या महाराष्ट्रातील माता-भगिनींना बळ द्यावे, जेणे करून त्याना स्वतःचे संरक्षण करता येईल, त्या करीता युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकारशी सलग्न असणारे स्टेअर्स फाउंडेशन महाराष्ट्र द्वारे २०२५ पासून वर्षातून दोनदा स्टेअर्स दुर्गाशक्ती प्रशिक्षण शिबिराला सुरुवात करीत आहोत.

पहिले प्रशिक्षण शिबीर ५ जानेवारी ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत स्टेअर्स दुर्गाशक्ती आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबीर चे आयोजन केले आहे, हे प्रशिक्षण यवतमाळ येथे दोन ठिकाणी आयोजित केले आहे. जास्तीत जास्त मुली व महिलांनी या दुर्गाशक्ती आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिरामद्धे सहभाग घ्यावा. शिबिरा करीता नोंदणी सुरु आहे,

संपर्क : ९४०३३५१०२३ / ७७५६८०४५४११. सत्यनारायण ले-आउट क्रीडांगण, अर्पणा मार्बल जवळ, वडगाव रोड, यवतमाळ २. स्काय इंटरन्याशनल स्कूल, साने गुरुजी नगर, वाघापूर रोड, लोहारा

स्टेअर्स दुर्गाशक्ती प्रशिक्षण शिबीर, यवतमाळ चे मुख्य आयोजक स्टेअर्स महाराष्ट्र राज्य कराटे स्पर्धा तांत्रिक निर्देशक सेन्साई सुजित पत्रे, महिला प्रशिक्षक आरती पत्रे व प्रशिक्षक स्वराज धनरे आहेत,

स्टेअर्स दुर्गाशक्ती प्रशिक्षण शिबीर चे मार्गदर्शक स्टेअर्स महाराष्ट्र राज्य कराटे स्पर्धा चेअरमन राजकपूर बागडी, स्टोअर्स महाराष्ट्र राज्य कराटे प्रमुख विशाल जाधव हे आहेत.

Copyright ©