ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ अंतर्गत पथनाट्य च्या माध्यमातून पोटगव्हाण येथे जनजागृती
ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ अंतर्गत चालणाऱ्या सम्यक प्रकल्पा अंतर्गत ग्रामपंचायत पोटगव्हाण येथे ग्रामपंचायत – विषय – ग्रामपंचायत विकास आराखडा , संविधान प्रस्ताविका व हागणदारीमुक्त गाव या विषयावर पथनाट्य च्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली यावेळी . ग्रामपंचायत पोटगव्हाण सरपंच – सौ . जयश्रीताई घोसले यांनी आपले मत मांडले की, पथनाट्य च्या माध्यमातून गाव विकासाला चालना मिळणार व गाव विकास करण्यासाठी प्रकल्प व संस्था नेहमी मार्गदर्शन करतात . असे मत व्यक्त केले व संस्थेचे आभार मांनले . तसेच शाळा व्यवस्थापन समिती चे वायकर सर यांनी गावातील सदस्य ना मार्गदर्शन केले,ग्रामपंचायत सदस्य, सौ.जयश्री ताई राहुल खाडे, श्री.संजय मोरे पोलीस पाटील दत्तात्रय तोडासे,तंटा मुक्ती अध्यक्ष मोहन पावडे,पंचायत मित्र प्रदीप कोळसे , शुभम फरकाडे GSMT Cluster Cordinator ,ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ येथील टीम व ग्रामस्थ उपस्थित होते.
