किन्ही येथे पुन्हा गोमातेची खुलेआम तस्करी

120

किन्ही येथे पुन्हा गोमातेची खुलेआम तस्करी

सी सी टीव्ही फुटेज असूनही तस्कर मोकळेच 

ग्रामीण पोलिसांची भूमिका संशयास्पद

यवतमाळ प्रतिनिधी

यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत किन्ही येथील रस्त्यावरील जनावरांची तस्करी खुलेआम सुरू असून पोलीस हे केवळ दिखाव करीत असल्याचे दिसून येत आहे.किन्ही येथील रात्री रस्त्यावर बसून असलेले जनावरे यांना लस देऊन त्यांना आलिशान वाहनात स्कॉर्पिओ, इनोव्हा सारख्या वाहनांमध्ये मध्ये कोंबून त्यांची तस्करी करण्यात येत असल्याचे सी सी टीव्ही फुटेज वरून दिसून येत असताना पोलीस गुन्हेगारांना पकडण्यास कोणतीही कारवाई करीत नाही त्या मुळे तस्कराची हिम्मत वाढतच चालली आहे अनेक गावातील रस्त्यावर बसणारे जनावरे अचानक गायब होत चालली आहे प्रत्येक गावातील वळू लुप्त होत आहे या मागील गायीची तस्करी करणारे मोठे रॅकेट ग्रामीण भागात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे किन्ही येथील हि तिसरी घटना असून दोन घटना सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असल्याने तस्करीचा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला आहे पोलीस मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यास आपले कर्तव्य विसरले आहे याची दखल गृह मंत्र्यांनी घेऊन कर्तव्यास कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.कारण गौमातेच्या होत असलेल्या तस्करी मुळे पशुधन कमी होत आहे एकीकडे सरकारनी गौमातेला भारत मातेच्या दर्जा दिला आहे आणि त्या गौमातेची कत्तली साठी खुलेआम तस्करी पोलिसांच्या मदतीने होत आहे, वाहनात तस्करी होत असताना वाहन शहरांमधून पास होते कसे ? असा सवाल नागरिकांकडून केल्या जात आहे.