विकासासाठी २५ कोटीची तरतूद केल्यामुळे कुंभार समाजात उत्साह.
मुंबई येथे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात माती कारागिरीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी व राज्यातील कुंभार समाजाच्या व्यावसायिक व आर्थिक प्रगतिकारिता भरघोस तरतूद केली. संत शिरोमणी गोरोबाकाका महाराष्ट्र मातीकला मंडळासाठी २५ कोटी रुपये देण्यात आले.त्या मुळे राज्य शासन प्रती समाजात आदर निर्माण तर झालाच मात्र
ना. फडणवीस यांचा सत्कारहि करण्यात आला. या वेळी कुंभार समाजाचे संजय गावंडे, विष्णू तवकार, कुंभार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते दत्ता खोपे, आकाश नर्सिंगकार, अक्षय वारकर, गणेश मेहरे, गोपाल घाटोळे, दिवाकर खोपे, भानूदास वारकर, वसंतराव नर्सिंगकार, वासुदेव नरसिंगकार, यशवंत चांदुरकर, तेजस नर्सिंगकार, देविदास नर्सिंगकार, ऋषिकेश गावंडे, अमोल खोपे, उपस्थित होते तर राज्याच्या विविध भागातून निलेश कोथळकर, कुंभार समाजाच्या प्रमुख सुभाष नर्सिंगकार, कुंभार पदाधिकार्यांच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात येत आहे तर समाजाचे असंख्य कार्यकर्ते आनंद उत्सव करीत आहे
