प्रतिनिधी/घाटंजी अमोल नडपेलवार
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा अटकेचा निषेधार्थ आपचे निवेदन.
घाटंजी:- दिल्लीचे उपमुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मनीष सिसोदिया यांना सीबीआयने सरकारचा दबावात येऊन राजकीय सुडापोटी बेकायदेशीर अटक केल्याचा निषेधार्थ आम आदमी पार्टी घाटंजीचा वतीने मा.राष्ट्रपती यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.मनीष सिसोदिया यांना केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून अटक करण्यात आली. त्यानंतर देशभरात त्याचे तीव्र पडसाद उमटने सुरू झाले. त्याच अनुषंगाने आम आदमी पार्टी घाटंजीचा वतीने राष्ट्रपती यांना सदर घटनेचा निषेधार्थ निवेदन देण्यात आले. देशात सतत असले घाणेरडे प्रकार भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरकारद्वारे होत आहे. देश लोकशाही कडून हुकूमशाही कडे मार्गस्थ होत असल्यामुळे जनते मध्ये प्रचंड असंतोष निर्माण होत आहे. देशात व राज्यात असंविधानिक पद्धतीने धाक, दडपशाही, शासकीय यंत्रणेचा गैरवापर, तोडा फोडीचे राजकारण करून सत्ता संपादन करण्याचे काम भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरकार करत आहे. हे अतिशय गंभीर बाब असून लोकशाही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. आपण देशाचे संविधानिक प्रमुख असल्यामुळे देशाची लोकशाही अबाधित राहावी यासाठी कठोर पावले उचलावी. अशा बेकायदेशीर अटकेचा आम्ही आम आदमी पार्टीचा वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. अशा आशयाचे निवेदन राष्ट्रपती महोदय यांना देण्यात आले.यावेळी आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष ॲड.वैभव निखाडे, शहर अध्यक्ष अमोल नडपेलवार, अमित ढालवाले, सागर सम्मनवार, ओमप्रकाश डोहळे, महेश लेदे, सागर राठोड, जॉनी राठोड, राहुल घोडे, विनय खोब्रागडे, दीपक देशमुख आदी तालुका व शहर पदाधिकारी उपस्थित होते. व आर्णी विधानसभा प्रमुख प्रेमदास चव्हाण यांची सुध्दा विशेष उपस्थिती होती.
