Home यवतमाळ शासकीय महा व रुग्णालयातील उदवाहन बनले ग्यास सिलेंडरचे गोडाऊन

शासकीय महा व रुग्णालयातील उदवाहन बनले ग्यास सिलेंडरचे गोडाऊन

12

यवतमाळ प्रतिनिधी पुरुषोत्तम कामठे

शासकीय महा व रुग्णालयातील उदवाहन बनले ग्यास सिलेंडरचे गोडाऊन

यवतमाळ:-येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैध्यकीय महाविद्यालय व रुग्णालंयातिल उदवाहन हे अधिष्ठाता मनीष श्रीगिरवार यांनी दुरुस्ती करून पूर्णपणे सुरु केले होते परंतु अधिष्ठाता मनीष श्रीगिरवार यांची बदली झाल्यापासून महा तथा रुग्णालयाला जणू काही ग्रहणच लागले रुग्णालयाची संम्पूर्ण व्यवस्थेची ऐसी तैसी झाली आणि दैनिय अवस्था सुरू झाली आहे.आजच्या वेळेत रुग्णालयाचे महत्व पूर्ण असलेले संपूर्ण उदवाहन बंद पडले एकीकडे रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा तर दुसरीकडे रुग्णांची वाढ सुध्दा होत आहे.त्या मुळे रुग्णांना मरण यातना भोगव्या लागते,हे उदवाहन बंद करून त्या ठिकानि ऑक्सिजन सिलेंडर ठेवण्याची व्यवस्था केल्या गेलेली आहे तर कुठले उदवाहन बंद करून त्या ठिकाणी उपहार गृह बनवल्या गेले असून सध्या आंधळ दळते कुत्र पीठ खाते अशी अवस्था या रुग्णालयाची झाली आहे.या रुग्णालयात पूर्णपणे राज्यशाही चा वापर केल्या जात आहे.रुग्णालंय प्रशासनाच्या या निर्णयाने कर्मचाऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. सोबतच रुग्णांना सुध्दा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या सर्व बाबिंवर जिल्हाधिकार्यांचे दुर्लक्ष का? असा सवाल सर्व सामान्यांन कडून करण्यात येत आहे .तर रुग्णालयाच्या या दैनियअवस्थेने यवतमाळ रुग्णालय या ना त्या कारणाने चर्चेत राहातं आहे,या गंभीर समस्या कोण सोडवणार ! हा प्रस्न अनुत्तरीत आहे या रुग्णालयात होत असलेल्या अनाधुंदी कारभाराणे जिल्हाधिकारी यांना जनतेचा आक्रोशास सामोरे जावे लागेल असे चित्र दिसत आहे.

Copyright ©